मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. बॉलिवूडमधील कलाकारांना आणि चाहत्यांना खूप मोठा धक्का होता. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूत नैराश्यामध्ये होता. यामुळे त्याने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं ही बाब मनाला चटका लावणारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काय पो चे' ते अगदी 'धोनी'पर्यंतचा सुशांत सिंह राजपूतचा सिनेमातील प्रवास हा सगळ्यांना थक्क करणारा आहे. सुशांत सिंहने 'छिछोरे' सिनेमातही उत्तम काम केलं होतं. ही सिनेमा एन्ट्री सुसाइड थिमवर आधारित होता. 


या सिनेमातील स्वतःचाच डायलॉग सुशांत सिंह विसरला. 'अक्सर हम हार-जीत, सक्सेस और फेलियर के बीच इस तरह से फंस जाते हैं कि भूल जाते हैं कि जिंदगी में सबसे जरूरी होती है 'जिंदगी'...' खरंच सुशांत सिंहने या डायलॉगकडे का दुर्लक्ष केलं असा प्रश्न सगळ्याच चाहत्यांना पडला आहे. 


पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. याच मालिकेतील अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत त्याचं नावही जोडलं गेलं. मात्र कालांतराने दोघंही वेगळे झाले. पण त्यांची जोडी प्रेक्षकांनी अतिशय पसंत केली. 


सुशांत सिंह राजपूत जवळपास १७ वर्षांनी आपल्या पैतृक गावी गेला होता. तिथे त्याच अतिशय जोरदार स्वागत करण्यात आलं. सुशांतने स्वतः त्यावेळीचे काही फोटो शेअर केले होते.