मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये देखील श्वास घुसमटल्यामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज सोमवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर अंत्यसंस्कार होणार आहेत. हे अंत्यसंस्कार मुंबईत होणार असून त्याच्या कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतचे पार्थिव बिहारला नेण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबिय आज १२ पर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. सुशांत सिंहचं पार्थिव रविवारी रात्री कुपर रूग्णालयात ठेवण्यात आलं. 


सुशांत सिंह राजपूत ५ ते ६ महिन्यांपासून मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार घेत होता. शनिवारी रात्री त्याला अधिक त्रास होऊ लागला. रविवारी त्याने राहत्या घरी हिरव्या रंगाच्या कुर्ताने गळफास लावून घेतल्याचं प्राथमिक अंदाजात स्पष्ट झालं. 


सुशांत सिंहची बहिण रविवारीच मुंबईत दाखल झाली होती. सुशांत सिंह गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्येत होता अशी माहिती मित्राने दिली असून तसे कागदपत्र घरात सापले आहेत. 



सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी घरात नोकर, क्रिएटिव्ह मॅनेजर आणि आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. सुशांतने ज्यूस पिऊन आपल्या रूममध्ये गेला तो बराचवेळ आलाच नाही. नोकराने जेवणाची विचारणा केली तेव्हा दरवाजा उघडला नाही. 


त्यानंतर २ ते ३ तासांनी मॅनेजरने सुशांतच्या बहिणीला फोन केला. त्यानंतर ती घरी आली चावीवाल्याला बोलावून दरवाजा उघडला गेला. तेव्हा सुशांत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.