मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput's death case) ईडीच्या चौकशीतून (ED Inquiry) धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि मॅनेजर सॅम्युअल मिरांडाचे (Samuel Miranda) मोबाईल क्लोन केले. यातून मिळालेल्या माहितीनुसार रियाने सुशांतचे डेबिटकार्ड चोरले होते. शिवाय सॅम्युअल मिरांडाकडून त्याचा एटीएम पिनही घेतला होता. सॅम्युअल आणि रियाचे संगनमत असून त्यांनी सुशांतच्या पैशाचा वापर केल्याचीही माहिती आहे. २०१७पासून रिया चक्रवर्ती ड्रग्जचे सेवन करत होती. व्हॉट्सऍप चॅटवरुन तिने अनेकवेळा गांजा, सीबीडीसारखे अंमली पदार्थ सेवन केल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयकडून आजही रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात येत आहे. तर सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि कूक नीरज सिंग, रजत मेवाणी यांची डीआरडीओ गेस्ट हाऊसवर पुन्हा एकदा सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत सीबीआयने रिया, शौविक, इंद्रजित चक्रवर्ती यांच्यासह सिद्धार्थ पिठाणी, नीरज, रजत मेवाती, महेश आणि सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी केली.



मात्र ही चौकशी वेगवेगळी केली. ८ जून ते १४ जूनला नेमकं काय घडलं? त्यावेळी सुशांत सोबत कोण कोण होतं? या सगळ्याची चौकशी करताना आता सगळ्यांची एकत्रित समोरासमोर बसवून सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.. डीआरडीओ गेस्टहाऊसमध्ये सीबीआयच्या चार टीम मिळून ही चौकशी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. शुक्रवारी रियाची जवळपास १० तास कसून चौकशी केली.यावेळी सीबीआयकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना रियाला उत्तर देता आली नसल्याची माहितीही मिळत आहे.