पुन्हा चर्चा Sushant Singh Rajput च्या डिप्रेशनची; कारण वाचून तुम्हालाही चीड येईल
दोन वर्षांनंतर त्याचे चाहते आपल्या आठवणींतून सुशांतसोबत घडलेला प्रकार आजही विसरू शकत नाही.
Sushant Singh Rajput: 2020 साली बॉलीवूडमध्ये सर्वात मोठं प्रकरण गाजलं ते सुशांत सिंग राजपूतचं. दोन वर्षांनंतर त्याचे चाहते आपल्या आठवणींतून सुशांतसोबत घडलेला प्रकार आजही विसरू शकत नाही. नेपोटिझम, डिप्रेशन हे विषय तेव्हा सर्वात जास्त चर्चेत होते. परंतु आता दोन वर्ष होऊन गेली तरी मात्र आजही या दोन शब्दांचा ससेमिरा काही जात नाही आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या डिप्रेशनवर अनेक चर्चा रंगल्या होत्या आता पुन्हा अशीच एक घटना घडली असून सुशांतच्या डिप्रेशनवरील चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. भारतातील एक नामवंत ऑनलाईन कंपनी याला जबाबदार ठरली आहे. 'फ्लिपकार्ट' या कंपनीनं आपल्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून डिप्रेशन या नावाचे प्रिंट असणारे टीशर्ट विकायला सुरूवात केली आहे. या प्रकारानंतर सोशल मीडियावरून #boycottfilpkart हा ट्रेण्ड social media वरून सुरू झाला.
'फ्लिपकार्ट्च्या' ऑनलाईन साईटवरून प्रिटेंड शर्ट अगदी हमखास मिळतात त्यावर नानाविध स्लोगन लिहिले असतात. पण आता अशाप्रकारे सुशांतच्या डिप्रेशनवरून त्याची खिल्ली उडवली गेल्याचा आरोप नेटकऱ्यांनी फ्लिपकार्टवर केला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे. अनेकांनी या प्रकरणावर विरोध दर्शवला आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, ''अशाप्रकारे फ्लिपकार्टने केलेले कृत्य अत्यंत लान्छनास्पद आहे. हे कोणत्या प्रकारेच मार्केटिंग आहे? ज्यासाठी एका हयात नसलेल्या व्यक्तीचा चेहरा वापरून आपलं प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न केला जातो आहे?''
तर काहींनी अशीही कमेंट केली आहे की, ''अजूनही संपुर्ण देश सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे दुःखात आहे. तसेच सुशांतसाठीही न्याय मागण्याचा प्रयत्न चालू आहे तेव्हा अशावेळी 'फ्लिपकार्ट'नं अश्या प्रकारचे कृत्य करणं अत्यंत चूकीचं आहे. 'फ्लिपकार्ट'ने माफी मागावी आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही याची खबरदारी 'फ्लिपकार्ट'ने घेणं आवश्यक आहे.''
सगळीकडून फ्लिपकार्टवर ताषेरे फोडल्यानंतर आणि 'फ्लिपकार्ट'विरूद्ध रोष वाढल्यानंतर कंपनीने हा टीशर्ट त्यांच्या साईटवरून मागे घेतला आहे.