मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याचे सगळे स्वप्न मागे ठेवत या जगाचा निरोप घेतला. सुशांतने अवघ्या ३४ व्या वर्षी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. अगदी कमी कार्यकाळात त्याने चाहत्यांच्या मनात आपले स्थान प्रस्थापित केलं. सध्या सुशांतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो डान्सर सुब्बालक्ष्मी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सुशांतच्या अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' या चित्रपटाच्या सेटवरील असल्याचं सांगितलं जात आहे. सौभाग्य वेंकटेश नामक एका व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत आनंदात मस्ती, डान्स करताना दिसत आहे. 



सुशांतचा 'दिल बेचारा' हा अखेरचा चित्रपट  ठरणार आहे. २४ जुलै रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'दिल बेचारा'  प्रदर्शित होणार आहे. हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्वांसाठी चित्रपट मोफत असणार आहे. चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री संजना सांघी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 


'दिल बेचारा' चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून सुशांत चाहत्यांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.