मुंबई : सध्या अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. एवढंच नाही, तर दोघांचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अशातंच महेश भट्ट यांनी शुटिंग दरम्यान सुष्मितासोबत केलेल्या वर्तवणुकीबाबत चर्चा रंगत आहे. एका मुलाखतीत खुद्द सुष्मिताने शुटिंगमध्ये घडलेल्या त्या घटनेचा खुलासा केला आहे. ज्यामुळे सुष्मिता पुन्हा चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री ट्विंकल खन्नाला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता सेनने खुलासा केला होता. एकदा महेश भट्ट यांनी 'दस्तक' सिनेमाच्या सेटवर तिचा अपमान केला. या घटनेमुळे ती इतकी दुःखी होती की तिला सिनेमा करायचा नव्हता. 


सुष्मिता म्हणाली, 'एक सीन होता ज्यामध्ये मला राग व्यक्त करत कानातले काढून फेकायचे होते. तेव्हा अनेक टेक्स घेऊन देखील हवे तसे भाव माझ्याकडून येत नव्हते. तेव्हा मीडिया आणि अनेक लोकांसमोर महेश भट्ट यांनी माझा अपमान केला.'


'त्यांनी वापरलेल्या टोकाच्या शब्दांमुळे मला रडायला देखील आलं. महेश भट्ट म्हाणाले कोणालं आणलं आहे.' यावर सुष्मिता संतापात म्हणाली, 'सिनेमासाठी तुम्ही मला फोन केला होता. मी नाही आले तुमच्याकडे काम मागण्यासाठी..'


पुढे सुष्मिता म्हणली, 'मी रागवल्यानंतर महेश भट्ट म्हणाले, की हाच संताप मला हवा आहे. त्यांनी मला पुन्हा हात धरून सेटवर आणलं आणि पुन्हा सीन करायला लावला...'


त्यानंतर सुष्मिताने तो सीन उत्तम रित्या केला. पण सीन करताना कानातले काढून फेकायचे होते, यात अभिनेत्री मात्र जखमी झाली. हा किस्सा 1996 सालचा आहे. जेव्हा सुष्मिताने तिच्या करियरला सुरुवात केली.