सुष्मितासोबत ब्रेकअपनंतर तिच्याच जवळच्या व्यक्तीवर Ex Boyfriend चं प्रेम; आता पुढे काय ?
आता पुढे काय ?
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन ही एका सुंदर नात्यात रमलेली असतानाच सारी समीकरणं बदलली आणि तिचा ब्रेकअप झाला. मॉडेल रोमन शॉल याच्यासोबत असणारं सुष्मिताचं प्रेमाचं नातं कायमस्वरुपात संपुष्टात आलं. मुळात सुष्मितानंही हे नातं फार काळ ताणून न धरता जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. (Sushmita sen)
सुष्मिता आणि रोमनच्या नात्यात आलेला दुरावा अनेकांनाच अनपेक्षित होता. पण, नियतीला हेच मान्य होतं.
आम्ही कायम एकमेकांचे चांगले मित्र राहू, असं म्हणणाऱ्या या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरीही आता मात्र ते अनेकदा एकमेकांवरच आदळत आहेत.
आता म्हणे सुष्मिताच्या अतिशय जवळच्या व्यक्तीनंच रोमनच्या मनात घर केलं आहे. त्याची कमेंट पाहूनच हे लक्षात येत आहे.
हल्लीच सुष्मितानं तिच्या मुलींसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. जिथे ती त्यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.
रिनी आणि अलिशा अशी तिच्या या दोन्ही मुलींची नावं.
सुष्मितानं हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट्स येण्यास सुरुवात झाली.
यात एक कमेंट ही दुर्लक्ष करता येणार नाही अशीच होती. कारण ती कमेंट होती रोमन शॉल याची.
त्यानं सुष्मिताची लहान मुलगी अलिशाच्या डान्सवर कमेंट करत तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं.
अनेकदा सुष्मिताच्या पोस्टमधूनही अलिशासोबत असणारं त्याचं नातं समोर आलं होतं. या व्हिडीओच्या निमित्तानं पुन्हा एकदा याच नात्याची वेगळी बाजू दिसली.
काही नाती संपली असली तरीही, याला अपवादही असतात हेच रोमनच्या कमेंटनं यावेळी दाखवून दिलं.
नेटकऱ्यांनीही यावेळी त्याचं तोंड भरून कौतुक केलं.