मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सुष्मिता ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी ललित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी माहिती दिली होती. त्यानंतर सुष्मिताला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता पुन्हा सुष्मिताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये सुष्मिता तिच्या जीवनातील खास व्यक्तींसोबत कॉफी डेट एन्जॉय करताना दिसत आहे. सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर फॅमेली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत आई आणि काही लोक दिसत आहेत. 


सुष्मिता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर गेली होती. फोटो शेअर करत सुष्मिताने कॅप्शनमध्ये, 'I love you guys!!' असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्री पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



फोटोमध्ये सुष्मिता सेल्फी घेताना दिसत आहे. अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होताच यूजर्स कमेंट करत आहेत. फोटोत यूजर्स सुष्मिताला ललित मोदीबद्दल विचारत आहेत. एका यूजरने लिहिले - 'ललित कुठे आहे?' तर दुसऱ्याने लिहिले - 'ललित अंकल दिसत नाहीत.'


दरम्यान, ललित मोदीने सुष्मिता सेनसोबत रोमँटिक फोटो शेअर करून आपल्या नात्याची घोषणा केली होती. त्यानंतर सुष्मितानेही आपल्या मुलींसोबतचे फोटो शेअर करून नात्याची कबुली दिली. सुष्मिता आणि ललितचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.