ललित मोदींच्या प्रेमात सुष्मिता सेन वेडी; शेअर केला आत्तापर्यंतचा सगळ्यात बोल्ड फोटो
ललित मोदी यांच्यासोबतचं नातं कन्फर्म केल्यानंतर सुष्मिता सेनला रोखणं कठीण होत आहे
मुंबई : ललित मोदी यांच्यासोबतचं नातं कन्फर्म केल्यानंतर सुष्मिता सेनला रोखणं कठीण होत आहे. येत्या काही दिवसांत ही अभिनेत्री स्वत:चे असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे की तिला पाहून तुम्हीही म्हणाल की, ललित मोदींच्या प्रेमात अभिनेत्री वेडी झाली आहे. आता सुष्मिता सेनने रिव्हिलिंग गाऊन घालून सोशल मीडियावर इतकी हॉट पोज दिली आहे की, हा फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री केवळ बोल्ड ड्रेस परिधान करताना दिसली नाही तर तिच्या सौंदर्याची जादूही खेळताना दिसली.
ब्रालेस होत घातला गाऊन
या फोटोमध्ये सुष्मिता सेनने काळ्या रंगाचा रिव्हलिंग गाऊन घातलेला दिसत आहे. हा फोटो पाहता तिने हा ब्रालेस गाऊन घातला असल्याचं स्पष्ट होत आहे. या फोटोची पार्श्वभूमी पाहता सुष्मिताने हा फोटो कोणत्याही स्टुडिओत नाही तर मेकअप रूमच्या बाहेर क्लिक केल्याचं दिसतंय.
ड्रेसमध्ये अनेक कट
या फोटोत सुष्मिता सेनने जो गाऊन घातला आहे तो थाई स्लिट आहे. यासोबतच हा गाऊन खूपच डिपनेक आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, सुष्मिता सेन केसांची पोनीटेल आणि लाईट मेकअपसह दिसली. सुष्मिता सेनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे.
ललित मोदी आणि अभिनेत्रीच्या वयात आहे मोठं अंतर
ललित मोदींनी ट्विटरवर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याचा खुलासा करताच सगळेच चक्रावून गेले. विशेष म्हणजे ललित मोदींनी अभिनेत्रीसोबतचे अनेक फोटोही शेअर केले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या वयातील अंतराचीही खूप चर्चा झाली. सुष्मिता सेन 46 वर्षांची आहे तर ललित मोदी 58 वर्षांचे आहेत. म्हणजेच सुष्मिता ललित मोदींपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.