मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनकडून लोकं प्रेरित होतात. सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सुष्मिताचे फॅन्स दररोज काही ना काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अलीकडेच सुष्मिताने मुलगी दत्तक घेतल्याची बातमी आली होती पण अधिकृतपणे कोणतीही बातमी आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता सेन तिच्या रिअल लाईफ मुलांवर जितकं प्रेम करते तितकंच प्रेम ती तिच्या रील लाईफ मुलांनाही देते. अशा परिस्थितीत सुष्मिता सेनची रील लाईफ मुलगी विर्तीसोबत तिचं खूप चांगलं बाँडिंग आहे. आर्या वेब सीरिजनंतर विर्तीच्या काही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


सुष्मिता सेनची रील लाईफ मुलगी विर्ती वाघानी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्यामध्ये विर्ती ही सुष्मिता सेनच्या मुलीच्या पात्रात दिसली होती. विर्तीचे ताजे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.


फोटोमध्ये विर्तीने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. हे फोटो पाहून एका यूजरने  ग्लॅमरस लूक. आर्याशिवाय, विर्ती टीव्ही शो जय श्री कृष्णामध्ये राधाच्या भूमिकेत दिसली होती. विर्ती आता १८ वर्षांची आहे. पण तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.



इंस्टाग्रामवर विर्तीचे खूप फॅन फॉलोअर्स आहे. इन्स्टाग्रामवर लाखो लोकं तिला फॉलो करतात. विर्ती तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. दुसरीकडे, सुष्मिता सेनबद्दल सांगायचं झालं तर, अलीकडेच तिचं रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती तिने दिली, मात्र दोघांनीही नातं संपवण्याचं कारण सांगितलं नाही.