Sushmita Sen's Ex Boyfriend Rohamn Shawl : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सुष्मितानं खुलासा केला की ती जवळपास 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. पण गेल्या 3 वर्षांपासून ती सिंगल आहे आणि तिचं आयुष्य जगते. पण आता तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं असं काही वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं आहे आणि त्यांच्यासमोर देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानं सांगितलं की त्याच्या आणि सुष्मिताच्या रिलेशनशिपला 6 वर्ष झाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं इन्स्टंट बॉलिवूडला मुलाखत दिली. त्यानं त्यांच्या रिलेशनशिपवर मोकळेपणानं वक्तव्य केलं आणि सांगितलं की गेल्या 6 वर्षांपासून ते सोबत आहेत आणि हे एक असं नातं आहे. ज्याला तो जपतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सुष्मिता आणि रोहमन हे दोघे 2018 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. डिसेंबर 2021 मध्ये दोघांनी सोशल मीडियावर एक घोषणा केली की त्यांचा ब्रेकअप झाला. मात्र, अजूनही ते चांगल मित्र आहेत. जेव्हा गेल्या वर्षी सुष्मिताला हार्ट अटॅक आला होता तेव्हा रोहमन हा तिच्यासोबत पूर्णवेळ होता. अशात त्यांच्या चाहत्यांना वाटू लागलं आहे की ते पुन्हा एकत्र आले आहेत. पण गेल्या काही दिवसांपूर्वी सुष्मितानं स्पष्ट केलं की ती सिंगल आहे. 


48 वर्षांच्या सुष्मिता सेनसोबत असलेल्या नात्यावर बोलताना रोहमन म्हणाला, 'ते तर 6 वर्षांपासून सोबत आहेत. त्यात नवीन काय आहे? आम्ही नेहमीच चांगले मित्र होतो आणि कायम राहू. आमच्या दोघांमध्ये काही स्पेशल आहे आणि ते दिसून येतं.'


हेही वाचा : मला Highest Paid कलाकार व्हायचं नाही! मराठी अभिनेत्यांच्या मानधवावर असं का बोलला प्रसाद ओक?


सुष्मितानं रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टवर म्हटलं की 'माझ्या आयुष्यात कोणीही पुरुष नाही. मी काही काळापासून सिंगल आहे आणि या गोष्टीला जवळपास 2 वर्ष झाले असतील. जर सांगायचं झालं तर 2021 पासून...  मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. हो, माझ्या आयुष्यात काही चांगले मित्र-मैत्रिणी आहेत, जे प्रतीक्षा करतात की मी कधी त्यांना फोन करेन आणि म्हणू ऐका, मी गाडी काढते आणि तुम्ही मागच्या सीटवर बसा. आपण गोवा जातोय. तिनं हे देखील सांगितलं की सध्या तिला कशात रस नाही. ब्रेक घेणं चांगलं आहे. रिलेशनशिपमध्ये ते पाच वर्ष होतं आणि तो एक मोठा काळ होता.'