सुष्मिता सेनच्या घरी हे काय घडलं? बाळाच्या जन्मानंतर वहिनीवर आली वाईट वेळ
सुष्मिताच्या वहिनीसोबत मात्र वेगळंच घडलं.
Postpartum Depression: गरोदर असल्याच्या दिवसांपासून बाळंतपणापर्यंतचा प्रत्येक दिवस महिलेच्या आयुष्यात वेगवेगळी वळणं आणत असतो. महिलेला नव्यानं घडवत असतो. पण, या काळात आनंदासोबतच काही आव्हानंही समोर येतात. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीनंही ही आव्हानं अनुभवली.
सुष्मिताच्या भावाची पत्नी, अभिनेत्री चारु आसोपा हिनं काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला. लेकिच्या जन्मानंतर चारु आणि राजीव सेन यांचं आयुष्य 360 अंशांनी बदललं. पण, एकिकडे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतानाच दुसरीकडे चारू मात्र वेगळ्याच परिस्थितीतून जात होती. (Sushmita Sen sister in law Charu Asopa actress was depressed post pregnancy)
चारुनं (Charu Asopa) बाळंतपणानंतरचा आपला काळ नेमका कसा होता, किंबहुना अद्यापही ती परिस्थितीशी कशी दोन हात करत आहे हे सांगितलं.
गरोदरपणानंतर आलेल्या नैराश्याबाबत चारु मोकळेपणानं बोलली. 'पोस्टपार्टम डिप्रेशन' बद्दल सांगताना चारु म्हणाली, 'मी फारच एकटी पडले होते. पूर्णवेळ मी एकटीच असायचे. तो काळ अतिशय वाईट होता. यातून बाहेर पडण्यासाठी मला फक्त माझ्या कामाचीच मदत झाली. लहानसहान जाहिराती करताना मला फार बरं वाटच होतं. मी जेव्हा जेव्हा काम करते तेव्हा तेव्हा मला फार चांगलं वाटतं.'
गरोदरपणानंतरच्या काळात नैराश्याचा सामना करणाऱ्या चारुनं आता आपण स्वत:ची काळजी घेत असल्याचं सांगितलं. नैराश्य ही एक अशी समस्या आहे, ज्याविषयी अद्यापही न्यूनगंड असल्यामुळं मोकळेपणानं बोललं जात नाही, अस सांगत या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे जेणेकरुन इतरांनाही परिस्थितीशी लढण्याचं धैर्य मिळू शकेल हा विचार तिनं सर्वांसमोर ठेवला.