Sushmita Sen Spotted with EX Boyfriend Rohit Shawl: गेल्या तीन महिन्यांपुर्वी सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त एकच चर्चा होती ती म्हणजे सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरची (Lalit Modi and Sushmita Sen). ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का ते एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर आता हे दोघं लग्न करणार का इथपासून सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. सुष्मिता सेननं आपलं ललित मोदीशी लग्न झालेलं नाही हे इन्टाग्राम पोस्टमधून शेअर केलं होतं (Sushmita Sen Instagram Post). त्यानंतरही महिनाभर तरी त्यांच्या चर्चा या सुरू होत्या. मध्यंतरी सुष्मिता आणि ललितच्या चर्चांना पुर्णविराम लागला होता. तोच आता सुष्मिता सेन पुन्हा एकदा ट्रेण्डिंग आली आहे. (Sushmita Sen steps out with ex-boyfriend Rohman Shawl viral photo)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती ललित मोदींमुळे नाही तर तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल मुळे (Rohman Shawl) चर्चेत राहिली आहे. सुष्मिता सेन रोहमनसोबत स्पॉट झाली आहे आणि ती स्पॉट होताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करण्यास सुरुवात केली. काही जण ललित मोदीचं नाव घेऊन टोमणे मारत होते तर अनेक जण तिच्या या फोटोवरून तिला प्रचंड ट्रोल करत होते. (Sushmita Sen Trolled)


हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...


शनिवारी रात्री डॉ हरिकेश पै आणि रेश्मा पै यांची मुलगी अन्विषा (Anvisha Pai) हिचे लग्न होते. लग्नाच्या फंक्शनमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. यावेळी त्यांच्या दोन्ही मुली सुष्मिता सेनसोबत दिसल्या. सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही तिच्यासोबत दिसला. सर्व मॅचिंग ब्लॅक आउटफिट्समध्ये होते. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलला पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. 


हेही वाचा - 'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा


सुष्मिता सेनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. एका यूजरने लिहिले, 'ललित मोदी सोबत गेले नाहीत'. तर दुसऱ्याने लिहिले, 'ललित मोदींच्या मॅडम दिसल्या.' 6 सप्टेंबर 2022 रोजी सुष्मिताने तिची मुलगी रेनीच्या 23 व्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. यातील एका फोटोमध्ये सुष्मिता तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत पोज देताना दिसली.