`बाईचं मन कुणा कळलं नाही गं...` स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित
मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. `बाई गं` असे स्वप्निल जोशीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्री झळकणार आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
Bai Ga Marathi Movie First Song : मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'बाई गं' असे स्वप्निल जोशीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्री झळकणार आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
सहा अभिनेत्रींच्या नृत्याचा जलवा
बाई गं या चित्रपटातील 'जंतर मंतर बाई गं' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात वेगवेगळ्या वयोगटातील सहा अभिनेत्री हरहुन्नरी अभिनेत्री स्वप्नील जोशीसोबत नाचताना दिसत आहेत. यात सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान यांच्या नृत्याचा जलवा दिसत आहे. त्यांच्यासोबत अभिनेता स्वप्नील जोशीही थिरकताना दिसत आहे. 'जंतर मंतर बाई गं' या गाण्यात या सर्वांचीच चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.
प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो, पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायकां असतील तर त्या पुरुषाची हालत काय असेल याची कथा सांगणारा 'बाई गं' हा चित्रपट येत्या 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
'जंतर मंतर' या पहिल्या गाण्यातून या चित्रपटाची छोटीशी झलक समोर आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मितवा या चित्रपटानंतर ते या चित्रपटात झळकणार आहे.
12 जुलैला प्रदर्शित होणार
'जंतर मंतर' हे गाणे अवधूत गुप्ते, कविता राम, मुघदा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर यांनी गायले आहे. तर वरुण लिखाते यांचे संगीत आहे. या गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिले आहेत. "जंतर मंतर" हे गाणं आपल्याला एवरेस्ट एंटरटेनमेंट वर पहायला मिळेल. तसेच बाई गं या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. या चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. तर छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' चित्रपट 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे.