Swara Bhaskar Wedding : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता बरेलीच्या मौलाना यांनी स्वराच्या लग्नावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. स्वराने आधी इस्लाम स्वीकारावा, त्यानंतरच तिचा विवाह वैध मानला जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरेली दर्गा आला हजरतचे धर्मोपदेशक मौलाना शहाबुद्दीन यांनी स्वराच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरियत इस्लामियाचा सरळ मार्ग आहे आणि जर मुलगी मुस्लिम समाजाची नसेल आणि तिने इस्लाम स्वीकारला नसेल आणि मुलगा मुस्लिम असेल आणि मुलीला त्याच मुलाशी लग्न करायचं असेल तर, मग हे कुराण आणि हदीसप्रमाणे मान्य नाही.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मौलाना म्हणाले की, मुलगी असो किंवा मग मुलगा, त्यांनी आधी इस्लाम धर्म स्वीकारला पाहिजे. जर एखाद्या मुलाने इस्लाम स्वीकारल्यानंतर विवाह केला असेल तर तो विवाह वैध मानला जाईल, अन्यथा तो विवाह वैध मानला जाणार नाही.


पुढे ते म्हणाले की मला जो प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे फहाद अहमदने स्वरा भास्करशी लग्न केले आहे, पण स्वराने इस्लाम स्वीकारला नाही. आता अशा स्थितीत दोघांचा विवाह शरियत आणि इस्लामच्या प्रकाशात वैध नाही. त्यांना विवाह वैध करण्यासाठी सगळ्यात आधी इस्लाम स्वीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे इस्लामिक विधी आणि रितीरिवाजांनुसार विवाह करणे आवश्यक आहे, तर हा विवाह वैध मानला जाईल, अन्यथा तो वैध नाही.


हेही वाचा : Alia नंतर Swara Bhaskar लग्नाआधीच प्रेग्नंट? बेबी बंप व्हिडिओचा धुमाकूळ


दरम्यान, 15 दिवसांपूर्वी स्वरानं फहादसोबतचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तो फोटो शेअर करत स्वरानं  कॅप्शन देत म्हणाली की, “जन्मदिनाच्या शुभेच्छा फहद मिया. भाईचा आत्मविश्वास असाच कायम राहो. आनंदी राहा आणि असंच काम करत राहा. आता वय वाढत चाललंय, लग्न करा. तुझा वाढदिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी चांगलं जाओ मित्रा.” त्यावर स्वराला उत्तर देत फहाद म्हणाला होता की “धन्यवाद जरनवाजी मैत्रिणी. भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे आणि हो, तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, त्यामुळे वेळ काढा, मला मुलगी सापडली आहे.”च्या आरोग्यावर आणि शरीरावर चांगले फायदे देऊ शकते.