Israel-Palestine conflict: इस्रायल (Israel) आणि हमासच्या (Hamas) दहशतवादी गटामध्ये शनिवारी सकाळपासून युद्ध सुरू आहे. युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे 1000 लोक मरण पावले आहेत. मृतांमध्ये अमेरिका आणि नेपाळसह इतर देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील रस्त्यांवर मृतांचे खच पडले आहेत. या सगळ्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. बॉलिवुड कलाकारांनीही या हिंसाचारावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी अभिनेत्री स्वरा भास्करनेही (Swara Bhaskar) प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर लोक उघडपणे इस्रायलला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही लोक पॅलेस्टाईनचेही समर्थन करताना दिसत आहेत. पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये मिया खलिफा, स्वरा भास्कर आणि गौहर खान यांचा समावेश आहे. स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या युद्धाबाबत भाष्य करत पॅलेस्टाईनला समर्थन दिलं आहे.


काय म्हटलंय स्वरा भास्करने?


'जेव्हा इस्रायलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला, जेव्हा इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांची घरे उध्वस्त केली आणि जबरदस्तीने हिसकावून घेतली तेव्हा, पॅलेस्टाईनच्या मुलांना आणि किशोरवयीन मुलांना सोडले नाही, गाझावर जवळपास 10 वर्षे सतत हल्ले केले आणि बॉम्ब फेकले तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल तर इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक करणाऱ्या लोकांची ही कृती मला ढोंगीपणाने भरलेली वाटते, असे स्वरा भास्करने म्हटलं आहे. एवढंच नाही तर स्वराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक लोकांच्या पोस्टही शेअर केल्या आहेत.


"गाझा आणि गाझामधील नागरिकांवर अनेक दशकांची नाकेबंदी आणि बॉम्बफेक, शाळा आणि रुग्णालयांवर बॉम्बफेक झाली.  त्यामुळे इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यांबद्दल तुमचा धक्का थोडा दांभिक वाटतो अशी मला भीती वाटते," असेही स्वराने म्हटलं आहे.


गौहर खानचाही पॅलेस्टाईनला पाठिंबा


अभिनेत्री गौहर खाननेही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. पोस्ट शेअर करताना तिने, 'अत्याचार करणारे कधीपासून पीडित झाले?' असा सवाल केला आहे. मात्र, या पोस्टनंतर लोक गौहरला ट्रोल करत आहेत.


कंगनाकडूनही निषेध


बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. "सोशल मीडियाद्वारे इस्रायली महिलांचे फोटो पाहून अस्वस्थ होण आणि घाबरणे अशक्यच आहे. त्यांच्या मृतदेहांवरही बलात्कार होत असून दहशतवादी त्यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. या घटनेनं माझे लाखो तुकडे केले आहे. माझे हृदय इस्रायल आणि तेथील मुली आणि स्त्रियासाठी आहे. प्रत्येक शहीद सन्माननीय मृत्यूस पात्र आहे," असे कंगनाने म्हटलं आहे.