Taapsee Pannu on Marriage: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तापसी सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यात तिचे ट्रॅव्हलिंगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. तापसीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. तापसी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतीच तापसीनं तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर संपर्क साधला अशावेळी तिच्या लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नाला पाहता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापसीनं इन्स्टाग्राम अकाऊंटच्या मदतीनं चाहत्यांशी संपर्क साधला. तिनं 'आस्क मी एनीथिंग' हे सेशन घेतलं होतं. या सेशन दरम्यान, तापसीला अनेक प्रश्न विचारले मात्र, सगळ्यांचे लक्ष हे एकाच प्रश्नानं वेधले आणि तो प्रश्न म्हणजे तू लग्न कधी करणार आहेस? त्या प्रश्नावर उत्तर देत तापसी म्हणाली की "मी अजून प्रेग्नंट झाले नाही म्हणून मला अजून घाई नाही." तापसीच्या उत्तरानं अनेकांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला आहे. पुढे तापसीला तू सगळ्यात शेवटी गूगलवर काय सर्च केलस याविषयी विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देत तापसीनं  विम्बलडन 2023 असं म्हटलं. तापसीचा बॉयफ्रेंड मैथियास बोए भारतीय टेनिस टीमचा कोच आहे. त्यामुळे तिला टेनिसची आवड असल्याचे अनेकांनी म्हटले. त्याच्यासोबत ती नेहमीच कुठे ना कुठे फिरायला जाताना दिसते. 



पुढे नेटकऱ्यांच्या प्रश्नावर तापसीनं तिचा आगामी चित्रपट डंकी विषयी सांगितले आणि त्यासोबतच त्याचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा एकदा ट्रीपला जाणार असल्याची योजया असल्याचे म्हटले. या चित्रपटातन तापसी पहिल्यांदा बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. 


हेही वाचा : Kangana Ranaut आलिया- रणबीरच्या जोडीला म्हणाली 'फर्जी', म्हणते "तो मला मेसेजे करून..."


सोशल मीडियाच्या विषयावर, तापसीने स्पष्ट केले की तिनं लोकांशी आणि चाहत्यांशी सकारात्मकतेने कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडियाचा जॉईन केलं. पण, परंतु हे खूप नकारात्मक आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते. दरम्यान, तापसीला एका गोष्टीचं वाईट वाटलं की चित्रपटगृहात महिलांवर आधारीत चित्रपटांना चांगली प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यात ‘मिली’ आणि ‘नीयत’ हे चित्रपट आहेत. त्यामुळे त्यावर आधारीत असे कोणतेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत. तापसी स्वत: ला चित्रपटसृष्टीतील आऊट साइड असल्याचे म्हणते त्यामुळे तिनं सुरु केलेल्या प्रोडक्शन कंपनीला तिनं ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ असं नावं दिलं आहे.