Taarak Mehta Amit Bhatt Health Update: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  मालिका कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. मालिकेतील प्रत्येक कालाकाराबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात, तर दुसरीकडे कलाकारांबाबत एखादी वाईट गोष्ट समोर आली तर चाहते चिंता व्यक्त करतात. गेल्या काही दिवसांपासून चाचा म्हणजे अभिनेते अमित भट्ट (amit bhatt) गेल्या काही दिवसांपासुन प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर चंपक चाचा यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. सध्या चंपच चाचा बेड रेस्टवर असून एक व्हिडीओ पोस्ट करत स्वतःच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. (amit bhatt Health Update)


काय म्हणाले चंपक चाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दोन दिवसांपासून चंपक (amit bhatt tmkoc) चाचा यांचा भीषण अपघात झाल्याच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझी तब्येत ठिक आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एक सीन होता जिथे सोढीच्या जीपचा टायर निघतो. तो टायर पकडण्यासाठी आम्ही सगळे त्याच्या मागे धावतो. (amit bhatt lifestyle)


'तेव्हा टायर माझ्या पायांना लागल्यामुळे मला किरकोळ दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितलं आहे.' असं देखील चंपक चाचा म्हणाले. (amit bhatt bapuji)


शिवाय व्हिडीओमध्ये चंपक चाचा यांनी मी सर्वांना miss करत आहे आणि प्रकृती पूर्ण ठिक झाल्यानंतर शुटिंगसाठी परतणार आहे असं देखील म्हटलं आहे. प्रकृतीबद्दल माहिती देत त्यांनी सोशल मीडियावर रंगत असलेल्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगत फेटाळल्या आहेत. (amit bhatt accident)