TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही टि.व्ही वरील अनेक प्रसिद्ध मालिकांपैकी आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका (series) लोकांचे मनोरजंन (Entertainment) करत आहे. या मालिकेनेतून अनेक कलाकारांना प्रसिद्ध व्हायची संधी मिळाली. या मालिकेनं त्या कलाकारांना  नाव आणि ओळख दिली. (Taarak Mehta fame sonu buy a new house)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच कलाकारांमध्ये 'निधी भानूशाली' (Nidhi Bhanushali) हे देखील नाव आहे. सध्या निधी त्या मालिकेचा भाग नाही, तरी तिची चर्चा सतत सोशल मीडियावर होत असते. सोशल मीडियावर निधी पुन्हा चर्चेत आली आहे कारण आहे तिचे 'स्वीट होम' (Sweet Home)...


आणखी वाचा... या अभिनेत्रीला करावा लागला 'कास्टींग काऊच'चा सामना, 60 वर्षाच्या प्रोड्यूसरने दिली होती ऑफर


निधी भानूशालीचे नवीन घर
निधी त्या कलाकारांपैकी आहे जिने मालिका सोडल्यानंतर ही तिची लाइमलाइट (Limelight) मात्रं गेली नाही. कधी ती तिच्या लूकसाठी नजरेत येते तर कधी तिच्या फोटोजमुळे. या वेळेस निधीने चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. तिने तिच्या इंन्सटाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर करत ही गाेड बातमी चाहत्यांना दिली आहे. 


फोटोमध्ये तुम्ही निळ्या रंगाचे घर पाहू शकता ते घर निधीचे आहे त्या घराला तिने स्वत:हून कलर केला आहे. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल... तिने पोस्ट करताना सांगितले की, तिला हे घर तयार करण्यासाठी चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. ती पुढे म्हणाली... तिला या सुंदर घराला रंगवण्यासाठी तिच्या  अतिशय प्रिय शर्टाचे बलिदान द्यावे लागले. तिने पोस्ट मध्ये 'RIP फेवरेट शर्ट' असे लिहीले आहे. हे दु:ख त्यांनाच कळू शकते ज्यांचे फेवरेट कपडे खराब होतात. 


निधीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 'सोनू' या पात्रामुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली होती. सोनू या भूमिकेत लोकांची मनं जिकण्यात ती यशस्वी झाली होती. ती जास्त काळ त्या मालिकेत राहू शकली नाही. तिने काही वेळातच त्या मालिकेला निरोप दिला. त्या मालिकेनंतर ही ती लोकांच्या मनात अजूनही घर करुन आहे. तिच्या अंदाजाने सोशल मीडियावर (Social Media) ती नेहमीच चर्चेत असते. 


ती आतापर्यंत तिच्या अभिनयाने लोकांपर्यंत पोहचली होती पण या पोस्ट वरुन तिच्या मध्ये घर रंगवायची देखील कला आहे हे कळलं.


आणखी वाचा... Viral Video : चक्क जंगली हत्तीने दिला वन अधिकाऱ्याला आशिर्वाद, Video पाहून तुम्हालाही वाटेल नवल