`Taarak Mehta...` फेम नट्टू काका या गंभीर आजाराने त्रस्त
`तारक मेहता का उल्चा चष्मा` मालिकेत नट्टू काका यांची भूमिका अत्यंत विनोदी आहे.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम नट्टू काका (Nattu Kaka)म्हणजेचं घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) सध्या कठीण प्रसंगाचा सामना करत आहेत. नट्टू काका कॅन्सरच्या विळख्यात सापडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजाराबद्दल माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी चित्रीकरण थांबवलं नाही. आजरापणात देखील 77 वर्षीय नट्टू काका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते.
तीन महिन्यांपूर्वी घनश्याम नायक यांच्या गळ्यात काही डाग दिसले. त्यानंतर त्यांनी पुढे उपचार करण्यास सुरूवात केली. एप्रिल महिन्यात त्यांच्या गळ्याची पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग केल्याची माहिती नायक यांच्या मुलाने दिली. नायक यांनी कीमोथेरेपी सेशन्स देखील सुरू केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रत्येक महिन्यात त्यांचं कीमो सेशन होतं.
'तारक मेहता का उल्चा चष्मा' मालिकेत नट्टू काका यांची भूमिका अत्यंत विनोदी आहे. कठीण प्रसंगात देखील ते गुजरातच्या दमनमध्ये शूटींगसाठी पोहोचले. ते पुन्हा मुंबईत शुटींग करण्यासाठी उत्सहित आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या गळ्याचं ऑपरेशन झालं. सतत उपचार घेत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.