मुंबई : 'तारक मेहता का उलटा चश्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah)या मालिकेतील  दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणीला कोण ओळखत नाही. सोजवळ आणि साध्या आशा दया भाभी ने प्रत्येक घरात आपली स्वत: ची जागा निर्माण केली आहे. दया भाभी म्हणजेच दिशा तशी बर्‍याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. परंतु दया बेण हे पात्र अजूनही खूप लोकप्रिय आहे. या मालिकेच्या चाहत्यांना अजूनही आशा आहे की, लवकरच त्यांना दिशा वकणी दया भाभीच्या भूमिकेत दिसेल. परंतु त्यानंतर दया भाभी समोर आली एका ती वेगळ्याच अंदाजात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा वकाणीचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. परंतु हा व्हिडिओ 'तारक मेहता का उलटा चश्मा' मधला नाही, तर हा एका डान्सचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये दिशा वकाणी बॅकलेस ब्लाऊझमध्ये डान्स करत आहे.


दिशाचा हॉट डान्स


'तारक मेहता का उलटा चश्मा'  या मालिकेतील गुजराती सून दिशा वाकानी केवळ साडी आणि गुजराती गरबा करताना दिसली. कधीही नाचायची वेळ आली किंवा आनंदाची गोष्ट घडली तरी दया भाभीला फक्त एकच डान्स यायचा तो म्हणजे गरबा. परंतु या व्हिडिओत ती बॅकलेस ब्लाऊझमध्ये कोळी लोकांसारखी दिलखुलास नाचताना दिसत आहे. दिशा वाकणीचा हा अवतार यापूर्वी चाहत्यांनी कदाचीत कधी पाहिला नसावा. हेच कारण आहे की, सोशल मीडियावर तिच्या डान्स ची चर्चा सर्वत्र होत आहे.


व्हिडिओमध्ये दिशा वाकानीने पिवळ्या गोल्डन रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस ब्लाऊझ घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. दिशांचा हा व्हायरल झालेला कोळी डान्सचा व्हिडिओ तसा बराच जुना आहे. या गाण्यात दिशाने एका चोरची भूमिका साकारली आहे, ती एका पोलिसाचा पॉकेट मारते.


त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी दिशा कोळी लोकांच्या वस्तीत पोहोचते आणि तेथे ती 'दर्या किनारे एक बंगलो ...' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.


चाहत्यांना धक्का


दिशा वाकानीचा हा अवतार पाहिल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. एका चाहत्याने अशी टिप्पणीही केली की, 'मी जेठालालला काय उत्तर देऊ?' त्याचबरोबर बरेच लोकं अभिनेत्रीचे आणि तिच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. बरेच लोकं असेही म्हणत आहेत की, त्यांनी दिशाला या रूपात पाहण्याचा कधीही विचार केला नव्हता.



सध्या दिशा बर्‍याच काळापासून 'तारक मेहता का उलटा चश्मा'चा भाग नाही. गरोदरपणामुळे तिने शोला निरोप दिला आहे.