मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा असाच एक शो आहे. ज्याचा लोकांना इतक्या वर्षांनंतरही कंटाळा आलेला नाही. आजही या शोचे खूप चाहते आहेत. पण या शोची सगळ्यात लोकप्रिय व्यक्तिरेखा दयाबेन आहे.  दयाबेन उर्फ ​​दिशा वाकानी आज शोचा भाग नसली तरी आजही चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. शोमध्ये सर्वांची मने जिंकणाऱ्या दयाबेनने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या आणि हृतिकसोबत केलं काम
टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. गेल्या 13 वर्षांपासून हा शो केवळ प्रेक्षकांच्याच हृदयात नाही तर टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. या शोची खास गोष्ट म्हणजे प्रत्येक कलाकार त्याच्या खास स्टाइल आणि पंच लाइनसाठी ओळखला जातो. अशीच एक कलाकार म्हणजे 'दयाबेन'. या शोमध्ये अभिनेत्री दिशा वाकानीने दया ही व्यक्तिरेखा साकारली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की दिशा वकानीने ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशनसोबत त्यांच्या एका सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे.


या चित्रपटात दिशाने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील एका सिन दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ऐश्वर्या बसलेली दिसत आहे. तर दिशा तिच्या शेजारी उभी आहे. यादरम्यान दिशाचा लूक खूपच बदललेला दिसत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचा हा फोटो खूप आवडला आहे.



दिशाचा फोटो व्हायरल झाला होता
आपल्या मुलीचं संगोपन करण्यासाठी दिशा शोपासून दुरावली होती आणि सध्या ती आपल्या मुलीला आणि कुटुंबाला वेळ देत आहे. दरम्यान, आता दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो तिच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.



अभिनेत्री ओळखणं कठीण
या  फोटोतील दिशाला पाहता तिला ओळखणं तुम्हाला कठीण जाईल. या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये लहान मुलगी तिच्या खांद्यावर झोपलेली दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर खूप थकवाही स्पष्ट दिसतोय. तिची ही अवस्था होण्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय. पण तिच्या स्माईलमध्ये भूतकाळातील गोडवा अजूनही आहे. दिशाकडे पाहता तिचं वजन  थोडं वाढलं आहे असं दिसतंय. आता अभिनेत्रीच्या या फोटोमुळे दिशाला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे. मात्र, ती कधी परतणार, हे सध्याच सांगता येणार नाही.