मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची लोकप्रियता काही कमी नाही. मुनमुन दत्तानं (Munmun Dutta) तिच्या एका लैंगिक शोषणा विषयी धक्कादायक खुलासा केला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुनमुननं हा खुलासा केला होता. #MeToo 


आणखी वाचा : 'मेरे हसबँड की शादी है' अभिनेत्रीचा मोठा खुलासा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनमुनने 2017 साली हा खुलासा केला होता. तिचे काका, शिक्षक आणि चुलत भावाने तिचे लैंगिक शोषण केले होते. याविषयी सांगताना मुनमुनने एक नोट लिहिली होती, 'असे काही लिहिताना त्या गोष्टींची आठवण केल्यामुळे डोळ्यातून अश्रू येतात, जेव्हा माझ्या बाजुला राहणारे काका आणि त्यांच्या नजरेची मला भीती वाटायची. जे संधी मिळाली की मला पकडायचे आणि मला धमकवायचे की कोणालाही काहीही सांगू नकोस. माझ्यापेक्षा वयाने मोठा असलेला माझा चुलत भाऊ किंवा ज्याने मला हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्यानंतर पाहिले आणि १३ वर्षांनी माझ्या शरीराला स्पर्श करणे योग्य आहे असे त्याला वाटले, कारण मी लहान होते आणि माझ्या शरीरात बदल होत होते. माझे शिक्षक ज्याचा हात माझ्या अंडरपॅंट मध्ये होता. आणखी एक शिक्षक जो वर्गात असलेल्या मुलीच्या ब्राचा स्ट्रॅप खेचत ओरडायचा किंवा मग रेल्वे स्टेशनवरील तो व्यक्ती ज्याने मला पकडले होते,' असे मुनमुन म्हणाली.


आणखी वाचा : ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा संघर्ष येणार रुपेरी पडद्यावर



आणखी वाचा : करिअरच्या शिखरावर अभिनेत्यानं का घेतला आश्रमात टॉयलेट साफ करण्याचा निर्णय?


पुढे मुनमुन म्हणाली, 'का? कारण तुम्ही खूप लहान आहात आणि बोलायला घाबरत आहात. एवढी भीती वाटते की तुमच्या पोटात गोळा येतो आणि गुदमरल्यासारखं वाटतं. तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही तुमच्या पालकांना हे सगळं कसं समजावून सांगाल किंवा तुम्हाला कोणालाही एक शब्दही सांगण्याची लाज वाटते.' 


आणखी वाचा : 'लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचं...', 'बिग बॉस'मध्ये साजिद खानला पाहून संतापली उर्फी जावेद


पुढे मुनमुन म्हणाली, 'मग तुम्हाला पुरुषांविषयी खूप राग येतो, कारण तुम्हाला माहित आहे की तुमचीजी परिस्थिती आहे त्याचे गुन्हेगार ते आहेत. त्या घाणेरड्या भावना त्या जाण्यासाठी वर्षे लागतात. मला आनंद आहे की या चळवळीत माझा आवज सामील झाला आहे आणि लोकांना याची जाणीव करून देते की त्यांनी मला ही सोडले नाही. पण, आज कोणीतरी माझ्याशी असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, तर मी त्याला सोडणार नाही. मी कोण आहे याचा मला अभिमान आहे.'