मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी मालिका 2008 पासून प्रसारित होत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले.  या टीव्ही मालिकेत 'नट्टू काका'ची भूमिका साकारणारे दिवगंत अभिनेते घनश्याम नायक यांच्याबद्दल एक गोष्ट समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 'नट्टू काका' ही व्यक्तिरेखा सर्वाधिक चर्चेत होती.


गेल्या वर्षी कॅन्सरशी लढत असताना नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांनी जगाचा निरोप घेतला. एका मुलाखतीमध्ये त्यांचा मुलगा विकास याने वडिलांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितले.


मृत्यूपूर्वी चेहऱ्यावर मेकअप करण्याची त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा होती, असे विकासने सांगितले. वडील घनश्याम नायक यांच्या या इच्छेला मान देत त्यांचा मुलगा विकास याने वडिलांच्या शेवटच्या क्षणी एका व्यावसायिक मेकअप आर्टिस्टला घरी बोलावून त्यांचा मेकअप करून घेतला होता. 



मृत्यूपूर्वी वडिलांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, असे विकास यांनी मुलाखतीत सांगितलं. मृत्यूच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांनी काय सांगितले होते, तेही विकासने या मुलाखतीत सांगितले होते.


विकासच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांनी आपली स्मरणशक्ती गमावली होती.