TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा लोकांचा आवडता शो आहे. ही विनोदी मालिका गेली 13 वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे. शोची स्टारकास्ट (TMKOC star cast) प्रचंड मोठी आहे, पण लोकांना प्रत्येक पात्र खूप आवडतं. तुम्हाला शोच्या प्रत्येक पात्राबद्दल माहिती असेल.  पण आता  रोशन सिंग सोढीच्या वास्तविक जीवनाबद्दल एक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये, पार्टीसाठी नेहमी तयार असणाऱ्या आणि आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करणाऱ्या रोशन सिंग सोढीचे खरे नाव गुरचरण सिंग (Gurcharan Singh) आहे. गुरचरण सिंगने आपल्या अनोख्या स्टाईलने शोमध्ये जीव लावला होता. (gurucharan singh wife) 



आज जरी तो शोचा भाग नाही, पण जेव्हा रोशन सिंग सोढीचा विषय येतो तेव्हा गुरचरण सिंगचा चेहरा प्रथम डोळ्यासमोर येतो. पण आयुष्यात एवढे साध्य करण्याआधी गुरुचरण सिंह खूप अडचणीत होते. त्याला सक्तीने मुंबईला यावे लागले. (tmkoc new sodhi real name)


कर्जबाजारी झाला होता 
एकेकाळी रोशनसिंग सोढीची भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंग यांनी अलीकडेच त्यांच्या एका लाईव्ह व्हिडीओमध्ये सांगितले की ते कर्जबाजारी असताना मुंबईला आले होते. पैसे मागण्यासाठी लोक त्यांच्या मागे लागले होते. जेव्हा गुरचरण सिंग यांना कुठूनही मदत मिळाली नाही, तेव्हा ते मुंबईला आले आणि सहा महिन्यांच्या आत त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये भूमिका मिळाली. (gurucharan singh instagram) त्यानंतर त्यांनी सर्व कर्ज फेडलं.


शोचा निरोप घेतला
गुरचरण सिंग शोचा अगदी सुरुवातीपासूनच एक भाग होता. त्याने 2013 मध्ये शो सोडला परंतु चाहत्यांच्या हट्टामुळे अभिनेत्याला पुन्हा 2014 मध्ये परत यावे लागलं. पण सहा वर्षे काम केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा 2020 ला शोला अलविदा म्हटलं. (new sodhi in tmkoc) यावेळी त्याच्या जागी रोविंग सिंग सोढीची भूमिका साकारणारा बलविंदरसिंग सूरी आला.