Taarak Mehta मधील `या` अभिनेत्याला Bigg Boss ची ऑफर, पण...
तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी मालिकेत सोढीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता गुरचरण सिंगबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.
मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी मालिकेत सोढीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता गुरचरण सिंगबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी काय आहे हे सांगण्यापूर्वी, हे जाणून घ्या की तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही मालिकेत सोधी या व्यक्तिरेखेने लोकप्रिय झालेल्या गुरुचरणने गेल्या वर्षीच शो सोडला होता. शो सोडल्यापासून गुरचरण कॅमेऱ्यापासून दूर आहे. आता बातमी अशी आहे की गुरुचरणला बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून दोनदा ऑफर मिळाल्या होत्या पण काही घडले नाही.
गुरुचरण म्हणाला, 'होय, चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केलेले बिग बॉस ओटीटी आणि सलमान खान होस्ट केलेल्या बिग बॉसच्या 15व्या सीजनसाठी दोन्ही वेळा मला संपर्क साधण्यात आला होता'. अभिनेता पुढे स्पष्ट करतो की, 'तथापि, दोन्ही वेळा काहीही करता आले नाही, दोन्ही वेळा विषय मध्येच थांबला.
मी बिग बॉसच्या निर्मात्यांना भेटलो होतो आणि मी बिग बॉस ओटीटीमध्ये जाणे जवळजवळ निश्चित झाले होते, मी पैशाबद्दलही चर्चा केली होती परंतु त्यानंतर कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. त्यांना मला शोमध्ये घ्यायचे होते पण ती गोष्ट पुढे कधीच वाढली नाही.
बिग बॉस ओटीटी अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिने जिंकली होता, तर निशांत भट्ट फर्स्ट रनर अप बनला होता. त्याचबरोबर बिग बॉस ओटीटी निशांत, प्रतीक सहजपाल आणि शमिता शेट्टी या तीन खेळाडूंना बिग बॉसच्या 15व्या सीजनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.