मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ने टीव्हीवर 3000 हून अधिक एपिसोड पुर्ण केले आहेत. हा शो जितका लोकप्रिय आहे तितकाच त्यातील कलाकारही घराघरात लोकप्रिय आहेत. जेठालाल असो किंवा टप्पू सेनेचे कलाकार असो, सोशल मीडियावर त्यांचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. असाच काहीसा प्रकार जुन्या सोनू म्हणजेच निधी भानुशालीच्या बाबतीत आहे. शो सोडल्यानंतरही सोनूच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे की, ती कुठे आहे, काय करत आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढी बदलली निधी
सध्या निधीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. लोक त्यांच्या लाडक्या सोनूला ओळखू शकत नाहीत. यात त्यांचाही दोष नाही म्हणा निधीचा गेटअप शोपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तारक मेहतामध्ये निधी सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे यांची मुलगी झाली होती. जी नेहमी पालकांची आज्ञा पाळते, मात्र व्हायरल होणारा फोटो खूप वेगळा आहे.



चाहत्यांना धक्का बसला
निधी भानुशालीच्या पहिल्या फोटोमध्ये ती सिनेमा हॉलच्या बाहेर बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती सेल्फी घेताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, शहरापासून दूर राहिल्यामुळे आम्ही थिएटरपासून दूर राहिलो. प्रवासात आम्ही आमच्या लॅपटॉपवर अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचा आनंद लुटला आहे. पण मोठ्या पडद्यावर एक उत्कृष्ट कलाकृती पाहण्याची अनुभूती अतुलनीय आहे. खरोखर आपण घरी परत आल्यासारखं वाटतंय.