मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्ही शो गेल्या 13 वर्षांपासून सर्वांच्या आवडीचा शो बनला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोकं हा शो आवडीने पाहतात. या शोमधील प्रत्येक पात्र खूप खास आहे. या शोमधील प्रत्येक पात्राचा वेगळा फॅन वर्ग आहे. फॅन फॉलोइंगच्या बाबतीतही या शोचे स्टार्स बॉलीवूड स्टार्सनाही टक्कर देतात. त्याचबरोबर शोमधील मोठ्या कलाकारांसोबतच बालकलाकारांनाही खूप पसंती दिली जाते. असाच एक कलाकार म्हणजे 'टप्पू' जो चाहत्यांना खूप आवडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये अभिनेता राज अनडकट 'टप्पू'ची भूमिका साकारत आहे. अभिनयासोबतच राज सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो दररोज त्याचे नवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांमध्ये पोस्ट करत असतो. दरम्यान, राजचा एक व्हिडीओ आणि काही फोटो चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. हे पाहून तुम्ही देखील आश्चर्यतकित व्हाल.


राज अनडकटने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या चेहऱ्यावर रक्त आणि खोल जखम दिसत आहेत. त्याचे संपूर्ण कपडेही फाटले दिसत आहेत. तसेच, त्याच्या कपड्यांवर रक्त आहे. राजला या अवस्थेत पाहून चाहते चांगलेच घाबरले आहेत.


पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण राजच्या या दुखापती खऱ्या नसून फक्त मेकअप आहेत. राजने त्याच्या 'हॅलोवीन' लूकने चाहत्यांना थक्क केले.


हा व्हिडीओमध्ये टप्पू सुरूवातील त्याच्या नॉर्मल रुपात दिसत आहे, परंतु त्यानंतर अचानक त्याच्यासोबत काही तरी घडते आणि तो विचित्र दिसू लागतो. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला आहे, तसेच त्याच्या चेहऱ्यावर खूप जखमा झालेल्या दिसत आहेत. त्याचे कपडे देखील फाटलेले दिसत आहे.


त्याचा हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर यावर कमेंट करत चाहते त्याच्या लूकचे आणि अभिनयाचे कौतुक केले आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चाहते जेठालालचे नाव घेऊन देखील राजची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'जेठालालने त्याला अशी अट घातली असावी.' ही पोस्ट आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.