`काहीच फरक पडत नाही...` `तारक मेहता`मधील `सोनू`च्या समर्थनार्थ उतरल्या `रोशन भाभी`
`तारक मेहता`मधील `सोनू` उर्फ पलक सिधवानीने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपानंतर मालिकेतील काही कलाकार तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली असून मालिकेतील पात्र आणि त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र, आता ही मालिका निर्माते आणि मालिकेतील कलाकारांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेतील 'सोनू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी हिने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपानंतर आता रोशन सिंह सोढ़ी देखील तिच्या समर्थनात उतरले आहेत.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील कलाकार अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दया बेन ते रोशन सिंह सोढ़ी यांच्यासह अनेक कलाकारांनी या विनोदी मालिकेचा निरोप घेतला आहे.
पलक सिधवानीने केले निर्मात्यावर गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वीच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील सोनूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पलक सिधवानीने या मालिकेच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीसला उत्तर पाठवले असून या मालिकेच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
अभिनेत्री पलक सिधवानीने तिच्यावर मानसिक छळ, शोषण आणि धमक्यांचे आरोप केले आहेत. आता काही दिवसांपूर्वी रोशन सिंह सोढ़ी पलक सिधवानीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
जेनिफर मिस्त्री बंसीवाल दिला 'सोनू'ला पाठिंबा
जेनिफर मिस्त्री बंसीवाल 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी निर्मात्यांना पैसे न देण्याचा आणि तिचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. आता तिने 'सोनू' उर्फ पलक सिधवानीला पाठिंबा देत असल्याच एका मुलाखतीत म्हटलं आहे.
'पलक सिधवानीच्या बाबतीत जे घडले ते प्रत्येक कलाकारांसोबत घडले आहे. जेव्हा कोणी शो सोडण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा निर्माते नेहमीच त्यांच्यासाठी समस्या निर्माण करतात. निर्माते काहीही करू शकत नाहीत, ते फक्त नाटक तयार करतात. ते कधीही कोणालाही या शोमधून आनंदाने जाऊ देत नाहीत'. अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
'तारक मेहता' ही मालिका जेलपेक्षा कमी नाही
जेनिफर मिस्त्री बंसीवाल हिने तिचा अनुभव शेअर करताना, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका एक तुरुंग आहे. जिथे कलाकारांना अशीच वागणूक मिळते. जेव्हा पलकला ही मालिका सोडायची होती तेव्हा निर्मात्यांनी तिला त्रास देण्यासाठी रणनीती आखली आणि तिला कायदेशीर नोटीस पाठवली. अभिनेत्रीने पलकचे एक गोड मुलगी म्हणून वर्णन केले आहे.