मुंबईः  छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही या मालिकेतून दिला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या मालिकेतील प्रत्येक पात्र वेगळं आहे..प्रत्येक कलाकाराची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. 



जेठालालचे वडील म्हणजे चंपकलाल गडाची भूमिका अमित भट यांनी साकारली आहे. अमित भट यांच्या यांच्या भूमिकेबद्दल काही रंजक गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.



'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील 'चंपकलाल' या पात्रासाठी कलाकाराचा शोध सुरू होता. अभिनेता दिलीप जोशी यांचं नाव 'जेठालाल'च्या भूमिकेसाठी नक्की झाल्यानंतर 'चंपकलाल'साठी निर्माते कलाकाराच्या शोधात होते.



तेव्हा अभिनेते दिलीप जोशी यांनीच अमित भट यांच्या नावाची शिफारस निर्मात्यांकडे केली. तेव्हा कोणत्याही ऑडिशनशिवाय अमित भट यांची चंपकलाल भूमिकेसाठी निवड झाली.



अमित भट हे गुजराती नाटक, सिनेमातील एक मोठं नाव आहे. 'तारक मेहता...' मालिकेपूर्वी त्यांनी अनेक नाटक, सिनेमात काम केलं आहे. मात्र, त्यांना खरी ओळख याच मालिकेने दिली



तारक मेहता या मालिकेत अमित भलेही जेठालालच्या वडिलांच्या भूमिकेत असतील मात्र अमित भट हे वयाने दिलीप जोशींपेक्षा बरेच लहान आहेत.



अमित भट हे वयाचे फक्त 47 वर्षांचे असून त्यांना जुळी मुलंही आहेत. अमित भट यांना फिरायला प्रचंड आवडतं त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पत्नी आणि मुलांसोबत ते फिरायला प्राधान्य देतात.



अमित भट हे सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात, तेव्हा त्यांचा खरा लूक पाहून 'चंपकलाल'च्या भूमिकेसाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे हे दिसून येतं