मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)ने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. मालिका गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. त्याचवेळी, शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज जाहीर केले आहे. आता मालिका तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त हसण्यास भाग पाडणार आहे. त्यामुळे निर्मात्यांनी घेतलेला मोठा निर्णय प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका आठवड्यातून 5 दिवस तुमचं मनोरंजन करत होती. आता ही विनोदी मालिका 6 दिवस प्रसारित होणार आहे. म्हणजेच, मालिका आता सोमवार ते शनिवार  नवीन भागांसह टीव्हीवर प्रसारित केली जाईल. ही प्रेक्षकांसाठी आनंदीची बातमी आहे. 


चॅनेल सोनी सबने विशेष 'महासंगम शनिवार' च्या घोषणेसह मालिका आठवड्यातून सहा दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त रविवारी मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांना पाहाता येणार नाही. तर शनिवारपर्यंत सर्वांना मालिकेचा आनंद घेता येणार आहे. 


महत्त्वाचं म्हणजे मालिकेने आतापर्यंत 3 हजार 200 एपिसोड पूर्ण केले आहेत.  मालिकेमध्ये गोकुळधाम सोसायटीच्या कुटुंबांची कथा दाखवली आहे. जिथे प्रत्येक धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. गोकुळधाम सोसायटीत दररोज एक नवीन समस्या येते, ज्यावर प्रत्येकजण मिळून मात करतो.