मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये आतापर्यंत प्रेक्षक जवळजवळ प्रत्येक पात्राला भेटले आहेत. इतके वर्ष सुरु असलेल्या या मालिकेतील प्रत्येक पात्रांचे नाव देखील प्रेक्षकांना  तोंडपाठ झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या मालिकेतील कलाकार आज घराघरात पोहोचले आहेत. पण काही पात्रे आहेत जी एकतर दिसली नाहीत किंवा फक्त काही एपिसोडमध्येच त्यांची झलक दाखवण्यात आली. त्यापैकी एक म्हणजे पिंकूचे आई आणि वडील...


पिंकू हा टप्पू सेनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरीकडे पिंकूचे गोकुळधाममध्ये घर नाही. पिंकू जो टप्पू सेनेच्या प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी असतो. त्याचे आई आणि वडील कोण? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात वारंवार येत होता. 


टप्पू, गोली आणि सोनूचे आई-वडील अनेकदा शोमध्ये दिसत असले तरी पिंकू नेहमीच एकटा दिसतो. एकदा मालिकेत पिंकूच्या आई आणि वडिलांची छोटीशी झलक दाखवण्यात आली. त्यानंतर एक प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आणखीन न ताणता एक खास एपिसोड पिंकूच्या आई आणि वडीलांवर बनवण्यात आला आणि ते  कोण आहेत हे गुपित उघड झाले.



एका स्पेशल एपिसोडमध्ये दाखवण्यात आले की पिंकूचे आई आणि वडील कोणी सामान्य व्यक्ती नसून सीक्रेट एजेंट आहेत. जे देशाच्या रक्षणासाठी काम करत आहेत. हा शेवटचा भाग होता जेव्हा पिंकूचे आई-वडील शोमध्ये दिसले. 


आता सोशल मीडियावर पिंकूच्या आई-बाबांचा हा विशेष भाग व्हायरल होत आहे. त्यामुळे याची खूपच चर्चा होत आहे.