TMKOC : बबितासोबतच्या अफेअर्सच्या चर्चेनंतर टप्पू शो सोडणार? मेकर्सची पहिली प्रतिक्रिया
टप्पू राहणार की जाणार?
मुंबई : टीव्ही शो, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मध्ये जेठालाल, तारक मेहता, दया, बापूजी ही पात्र प्रेक्षकांच्या खूप जवळ आहेत. मात्र या सगळ्यांपेक्षा लक्षवेधी ठरतो तो म्हणजे टप्पू...
टप्पू सेना ही अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत सोसायटीत धम्माल करत आहे. ही टप्पू सेना प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. टप्पू सेनेने या कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरला आहे.
काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, टप्पू म्हणजे राज अनादकत (Raj Anadkat) तारक मेहता का उल्टा चष्मा सोडू जाणार आहे. यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या मेकर्सनी सत्य समोर मांडल आहे.
टप्पू राहणार की जाणार?
खरं तर, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये भव्य गांधी टप्पूची भूमिका साकारत असल्याने, या पात्रातील राज चाहत्यांना खूप आवडतो. अशा परिस्थितीत राजबद्दलच्या या बातमीने चाहते खूपच निराश झाले आहेत.
आता चाहत्यांना दिलासा देण्यासाठी निर्मात्यांनीच या बातमीची सत्यता सांगितली आहे. आमच्या पार्टनर वेबसाइट Bollywoodlife.com च्या बातमीनुसार, राज शो सोडत नाही आहे.
मेकर्स मात्र नाराज
या रिपोर्टनुसार राज अनादकट 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडत नाही आहे. कारण एका सूत्राने खुलासा केला आहे की, मीडियामध्ये पसरवलेल्या या अफवामुळे निर्माते चांगलेच संतापले आहेत.
परंतु अद्याप या अफवेवर निर्माते अधिकृतपणे काहीही बोलत नाहीत कारण त्यांना असे वाटते की यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण राज शोमध्ये टप्पूची भूमिका करत राहणार हे खरे आहे.
मुनमुन दत्ताबाबतही होते चर्चा
या सूत्राने सांगितले की, 'काही दिवसांपूर्वी बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ताबद्दल अशीच बातमी आली होती की ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडत आहे. पण आत्तापर्यंत मुनमुन सतत शोमध्ये दिसत आहे.
यानंतर मीडियामध्ये बातम्या आल्या की राज आणि मुनमुनमध्ये अफेअर आहे किंवा दोघे एकमेकांच्या खूप जवळ आहेत.
यावरून राज आणि मुनमुन संतापले. कारण दोघांनाही त्यांच्याबद्दल अशी बातमी पसरवायची नव्हती, ज्याची माहिती त्यांनी प्रॉडक्शन हाऊसलाही दिली.
पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. कलाकारांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात पण काळाबरोबर गोष्टी चांगल्या होतात.