मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)देशातील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. बराच काळ चालणारा हा शो आहे. नुकतेच या कार्यक्रमाने 13 वर्षे पुर्ण केले आहेत. या कार्यक्रमामुळे अनेक कुटुंब एकत्र बसून हा कार्यक्रम पाहतात. या कार्यक्रमामुळे अनेक नाती एकत्र आलेत. या कार्यक्रमातील लोकप्रिय जोडी जेठालाल आणि बापूजी म्हणजे चंपकलाल यांच खऱ्या आयुष्यात नातं खूप वेगळं आहे. हे दोघं एकमेकांपासून पुरेसं अंतर ठेवून असतात. 


इंस्टाग्रामवर करत नाहीत फॉलो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमातील कलाकारांची खासियत आहे की, ते सगळेच सोशल मीडियावर आणि खास करून इंस्ट्ग्रामवर खूप ऍक्टिव आहेत. मात्र धक्कादायक बातमी अशी आहे की, जेठालाल म्हणजे दिलीप जोशी आणि त्याचे बापूजी म्हणजे अमित भट्ट इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत नाही. यामुळे अनेकांच्या मनात येतंय की, 'या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी ठिक तर आहेत ना?' मात्र याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


जेठा टप्पूला देखील करत नाही फॉलो 


या अगोदरही अशीच माहिती समोर आलेली की, जेठालाल आपला ऑनस्क्रीन मुलगा टप्पू म्हणजे राज अनादकटला इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. या दोघांच पटत नाही अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र दिलीप जोशी यांनी ही बकवास असल्याच म्हटलं होतं. 


शैलेश लोढासोबतही मतभेद 


टप्पूसोबत पटत नसल्याची बातमी येण्याअगोदर दिलीप जोशी आपला ऑनस्क्रीन मित्र तारक मेहता म्हणजे शैलेश लोढासोबत काही तरी वाद असल्याचं म्हणत होते. यानंतर दिलीप जोशीने एका मुलाखतीत ही अफवा असल्याचं सांगितलं. 13 वर्षांपासून एकमेकांसोबत काम करतोय. जेव्हा लोकं यांच्यातील दुराव्याबद्दल बोलतात तेव्हा मी याच्यावर हसतो. असे देखील दिलीप जोशी म्हणाले.