Taarak Mehta मधील सोनूचा तो बेडरुम व्हिडिओ सारखा का पाहिला जातोय?

शोमधील बालकलाकार आता मोठे झाले आहेत.
मुंबई : 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजन शोचे काही कलाकार असे आहेत की, त्यांना लहानपणापासूनच लोकांनी पाहिले आहे.
शोमधील बालकलाकार आता मोठे झाले आहेत. त्यातील काहींनी शो जरी सोडला असला, तरी ते स्टार्स आजही लोकांच्या हृदयाच्या जवळ आहेत. या शोचा एक भाग असलेली अभिनेत्री निधी भानुशाली म्हणजेच जुन्या 'सोनू'ला सोशल मीडियावर लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. आता निधी भानुशालीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडिओमध्ये निधी एका अंधार असलेल्या रुममध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे. ती तिच्या चाहत्यांना एक गाणे ऐकवत आहे.
गिटार किंवा कोणत्याही संगीताशिवाय ती 'तू बोले...' हे गाणं गात आहे.तिचा आवाज अनेकांना भूरळ घालतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक निधी सिंगर बनण्याचा सल्ला देत आहेत. हा आवाज त्यांना नशेत टाकत असल्याचे चाहते सांगत आहेत.
निधीचे अनेकदा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या साहसी आयुष्यातील फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते. आता निधीचा हा लेटेस्ट व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्याचा अंदाज लोकांना खूप आवडतो आहे.