`या` प्रसिद्ध अभिनेत्यामुळे तब्बू अद्यापही जगते एकटं आयुष्य
अभिनेत्यामुळे तब्बू अद्यापही जगते एकटं आयुष्य; कारण अखेर आलं समोर
मुंबई : सध्या टीव्ही विश्वात आणि बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहात आहेत. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात करत आहेत. पण झगमगत्या विश्वात असे देखील काही कलाकार आहे जे आजही एकटं जीवन जगतात. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री तब्बू. करियरमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेली तब्बू आजही एकटी आयुष्य जगते. तब्बू 51 वर्षांची आहे. पण तिने लग्न केलं नाही.
तब्बूने कधी लग्न तर केलं नाही, पण तिचा एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्या काळी तो अभिनेता कोण आहे? याबद्दल कोणाला काही माहिती नव्हती. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर अभिनेता अजय देवगन असल्याचं अखेर समोर आलं.
अजय आणि तब्बू अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एवढंच नाही तर दोघे एकमेकांचे चांगले मित्र देखील होते. तब्बूचा भाऊ समीर आर्य, अजय देवगनचा शेजारी होता. त्यामुळे तब्बू आणि अजय दोघांची ओळख झाली. जेव्हा एखादा मुलगा तब्बूला भेटायचा तेव्हा समीर आणि अजय त्या मुलाला मारयचे असं एका मुलाखतीत खुद्द तब्बूने सांगितलं.
एवढंच नाही तर तब्बूने अद्याप एकटं राहात असल्यासाठी अजयला जबाबदार धरलं आहे. पण ती अजयला खास मित्र देखील मानते. दोघांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर 'विजयपथ', 'हकीकत', 'तक्षक', 'दृश्यम', 'गोलमाल अगेन', 'दे दे प्यार दे' अशा प्रसिद्ध सिनेमांच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.