बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu) सध्या मोठ्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. एकीकडे अभिनेते, अभिनेत्री एका हिट चित्रपटासाठी संघर्ष करत असताना दुसरीकडे तब्बू मात्र एकामागोमाग हिट चित्रपट देत आहे. त्यातच आता तब्बू पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. तब्बू आणि अजय देवगण (Ajay Devgan) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्यासाठी सज्ज आहेत. 'औरो मे कहाँ दम था' (Auron Mein Kahan Dum Tha)चित्रपटाच्या निमित्ताने दोघे दहाव्यांदा मोठ्या पदद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही एक लव्ह स्टोरी असून यामध्ये जिमी शेरगिलही मुख्य भूमिकेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तब्बूने 'न्यूज 18' शी संवाद साधला. यावेळी तिने अजय देवगणसोबतच्या आपल्या मैत्रीवर भाष्य केलं. ती म्हणाली, "तुम्ही मला अजयसोबतच्या मैत्रीबद्दल विचारणार आहात का? कारण मी अजून एकदा त्यावर बोलले तर अजय मैत्री तोडून टाकेल".


चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला तेव्हा तब्बूने अजय नेहनी गॉसिपिंगमध्ये असतो, आणि सगळा दोष आपल्यावर ढकलतो असा दावा केला होता. तब्बूकडे बॉलिवूडमधील सर्व माहिती आहे का? असं विचारण्यात आलं असता तिने सांगितलं होतं की, "नाही हे चुकीचं आहे. तो फक्त माझी बदनामी करत आहे. तो मला गॉसिप करण्यासाठी सांगत असतो हे मी प्रत्येकाला सांगितल्याने तो हे सांगत असतो. ही त्याची सत्य लपवण्याची पद्धत आहे. माझ्याकडे इंडस्ट्रीमधील कोणाबाद्दल काहीच माहिती नाही. माझ्याकडे तर माझ्याबद्दलही फारशी माहिती नाही".


याच मुलाखतीत तब्बूने इंडस्ट्रीमधील वयावरील वाद आणि लैंगिकता यावर भाष्य केलं होतं. आपल्याला स्क्रीनवर 30 वर्षाच्या महिलेची भूमिका निभावण्याची इच्छा नाही असं तिने सांगितलं होतं. जरी मला ऑफर्स आल्या तरी मी स्विकारणार नाही असं ती म्हणाली होती. तब्बूने सांगितलं होतं की, "चित्रपटात तब्बूच्या तरुणपणातील भूमिका सई मांजरेकर निभावणार आहे. याआधी जेव्हा डी-एजिंग कल्पना नव्हती तेव्हाही अशा गोष्टी होत होत्या. आपण वेगवेगळ्या कलाकारांना नायकाच्या लहान वयाची भूमिका करताना पाहिलं आहे. ते मोठे झाले की धर्मेंद्र किंवा दिलीपकुमार व्हायचे. मला वाटतं की या चित्रपटाद्वारे आपण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहोत".


तब्बू सध्या 'औरों में कहाँ दम था'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असून या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तो प्रदर्शित होईल. ट्रेलर शेअर करताना तब्बूने " तीव्र. अविस्मरणीय! AuronMeinKahanDumTha Trailer Out Now!" असं शेअर केलं आहे. 


अजय देवगण आणि तब्बू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. गोलमाल अगेन, दे दे प्यार दे, विजयपथ, हकीकत, भोला आणि दृश्यम अशा अनेक चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसले होते. नीरज पांडे दिग्दर्शित 'औरों में कहां दम था' या चित्रपटात जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी देखील आहेत.