मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान नेहमीच प्रकाश झोतात असतो. त्याच्या आई - वडीलांपेक्षा त्याच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तैमूर बद्दल सतत पोस्ट येत असतात. नुकताच एका नेटकऱ्याने तैमूरला ट्रोल केले. तो म्हणाला, 'तैमूर भूकेने मरत आहे आणि करिना उत्तम आई नाही' अशा शब्दात त्याने तैमूरवर निशाना साधला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अरबाज खानच्या 'पिंच' चॉट शो मध्ये करिना उपस्थित होती. तेव्हा एका नेटकऱ्याने तैमूरला ट्रोल कले. त्यावर करिनाने प्रतिक्रिया दिली, तैमूर भूकेने मरत नसून. सध्या तो जास्तच जाडा झाला असल्याटे तिने सांगितले. याआधी अरबाजच्या या चॉट शओ मध्ये नेटकऱ्यांनी  तिला आन्टी म्हणून संबोधले होते. 


करिना म्हणते, कित्तेक वेळा मीडिया आपल्या सिमांचे उल्लंघन करते. विशेष करून जेव्हा तैमूरची गोष्ट असते. तो कोठे जातो, काय करतो, काय खातो? कधी तरी ठीक आहे पण हे नेहमीचेच आहे. तैमूर हा फक्त दोन वर्षांचा आहे. त्याला त्याचे आयुष्य जगू द्या.