मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान प्रसिद्ध स्टारकिडपैकी एक आहे. सोशल मीडियावरचं नाही तर खऱ्या आयुष्यात देखील त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमलेली असते. या जमलेल्या गर्दीला तैमूर त्याच्या खास अंदाजात प्रतिसाद देताना दिसतो. कायम चर्चेत असणारा तैमूर त्याच्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांचा आणखी फेव्हरेट झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिमध्ये तो वाढदिवसाचं गाणं म्हणताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांसोबत मोठ्या आवाजात वाढदिवसाचं गाणं बोलत तैमूर  एका स्टाफचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तैमूर मोठ्या आवाजात गाणं गात आहे. त्यावर सैफ म्हणतोय चांगल्या प्रकारे शुभेच्छा दे. त्यानंतर तैमुर देखील वडिलांच्या सुराला सूर मिळवत गाणं गात आहे. 


सोशल मीडियावर तैमुरचा हा अंदाज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय त्याच्या चाहत्यांच्या कमेंट देखील व्हिडिवर येत आहेत. काहींनी तर त्याला गायक होण्याचा देखील सल्ला दिला आहे.