मुंबई : 'तो शायद हिंदूस्तान का इतिहास कुछ और होता...' प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा बहुप्रतिक्षित 'तख्त' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गेल्या वर्षापासून चाहते 'तख्त' चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. तर करण जोहरने चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत, अखेर करणने या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. ऐतिहासिक कथेवर आधारलेला या चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 



खुद्द करण जोहरने चित्रपटाचा ट्रेलर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केला आहे. 'तख्त' चित्रपट २४ डिसेंबर २०२१ रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. हिरू यश जौहर, करण जौहर आणि अपूर्वा मेहता यांनी चित्रपटाची  निर्मीती केली आहे. 


तर सुमित रॉय लिखित चित्रपटात रणवीर सिंग, विकी कौशल, करिना कपूर खान, अनिल कपूर, अलिया भट्ट आणि जान्हवी कपूर, भूमी पेडनेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तगडी स्टारकास्ट असल्यामुळे चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.