Talyor Swift Concert Highest Ticket Price: सध्या जगभरात म्युझिकला तरूणाईमध्ये सगळ्यात अव्वल स्थान आहे. त्यातून असे अनेक लोकप्रिय संगीतकार, गायक आणि कलाकार आहे ज्यांची जगभरातल्या तरूणाईसह भारतातील तसेच मराठी तरूणां मुलांनाही चांगलीच भुरळ आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे टेलर स्विफ्ट. तिची लोकप्रियता अफाट आहे. इन्टाग्रामवर तिचे 26 कोटीहून जास्त फॉलोवर्स आहेत. मध्यंतरी तिच्या आणि Diljit Dosanjh सोबतच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ती कायमच चर्चेत असते आता तिच्या कॉन्ससर्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तिच्या या कॉन्ससर्टचे तिकट ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तिच्या एका कॉन्ससर्टच्या तिकिटाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का तर बसेलच परंतु या पैशांत तुमचा पगारही कदाचित बसणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार, या तिकिटाची किंमत ही 254 डॉलर इतकी आहे. त्यामुळे भारतीय रूपयांनुसार ही किंमत 21,000 रूपयांपर्यंत जाते. एवढा अधिकाअधिक लोकांचा पगार असेल. यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.  The Eras Tour च्या निमित्तानं सध्या टेलर स्विफ्ट ही कोट्यवधी रूपये कमावते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या टूरमधून एका रात्रीत तिची कमाई 13 मिलियन डॉलर म्हणजे 100 कोटी रूपये होते आहे.   तिच्यापेक्षाही जास्त मानधन घेणारे गायक आहेत परंतु त्यांनाही मागे टाकत टेलर स्विफ्ट पुढे गेली आहे. 


गायकांच्या मानधनात वाढ 


रिपोर्टनुसार, टेलर स्वीफ्टच्या मानधन 134 डॉलरची वाढ झाली आहे. असे अनेक गायक आहेत जे 200 डॉलरपेक्षाही जास्तम मानधन एका रात्रीत घेत आहेत. पाच वर्षांपुर्वी, Ed Sheeran हा गायक 89 डॉलर एका कॉन्ससर्टमधून कमावतो तर 200 डॉलर कमावणारे ब्रिटनी स्पीयर्स आणि सेलिन डायन हे आहेत. गेल्या काही वर्षात या तिकिटांमध्ये 13.60 डॉलरची वाढ झाली आहे जी किंमत खरंतर ग्राहकांच्या किंमतीपेक्षा अधिक वाढू  लागली आहे असं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. 


हेही वाचा - इमोशन्स, ड्रामा आणि सर्वकाही; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' नक्की कशी आहे? पाहा ट्रेलर


प्रेक्षकांची गर्दी 


सध्या तिच्या या टूरची सर्वत्र चर्चा आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी, जपान अशा अनेक ठिकाणी तिचे हे कॉन्ससर्ट्स होणार आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी यासाठी नक्कीच गर्दी करायला सुरूवात केली असेलच. सध्या टेलर स्वीफ्ट ही जगातील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका ठरली आहे. सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत.



तिनंही याबद्दलची आपली अपडेट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. याला 50 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.