मुंबई : नाना पाटेकर - तनुश्री दत्ता यांच्यातील वाड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पडद्यावर नाना पाटेकरचा राग जसा भयंकर आहे तसं त्याच खाजगी जीवन नाही. पर्सनल लाइफमध्ये नाना खूप एकटा आहे असं म्हटलं जातं. ही गोष्ट कुणाकडून लपलेली नाही. अनेकदा ही चर्चा थांबवली जाते. तनुश्री दत्ताने नानांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लगावले आहेत. नानांच्या या स्वभावाबद्दल आता आणखी एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नानासोबत काम केलेली अभिनेत्री रवीना टंडने देखील त्यांच्या गैरव्यवहारावर प्रश्न उभे केले आहेत. तसेच अभिनेत्री डिंपल कपाडियाचा देखील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये नानांची डार्क साइडसमोर आली आहे. रवीनाने नुकत्याच एका ट्विटमध्ये सांगितलं की, नाना - तनुश्रीच्या प्रकरणात कोणीही साक्षीदार नाही. पण या प्रकरणामुळे तनुश्रीचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. रवीनाने म्हटलं की, मी नानांसोबत काम केलं पण त्यांचा राग पाहिला नाही. पण खूप लोकांकडून त्या रागाबद्दल ऐकलं आहे. पण हे खरं आहे की, नानांनी अनेक प्रसंगामध्ये माझी मदत केली आहे. 


तर डिंपल कपाडियाने एका मुलाखतीत सांगितलं की, नानाच्या दोन बाजू आहेत एक चांगली आणि एक वाईट. नानाच्या अभिनयाशी कुणीही तुलना करू शकत नाही तो अतिशय प्रतिभाशाली आहे. त्याचा अभिनय पाहिला की असं वाटतं उत्कृष्ठ कलाकार आहे नाना. एक व्यक्ती म्हणून नाना माझ्याशी चांगले वागले. ते माझे चांगले मित्र आहेत पण मी त्यांच भयानक रूप देखील पाहिलं आहे. प्रत्येक माणसांत एक डार्क साइड असते आणि ही साइड कायम सगळ्यांकडून लपून ठेवली जाते. डिंपल यांनी नानांसोबत 'प्रहार', 'अंगारे', 'क्रांतीवीर', 'वेलकम बॅक' सारखे सिनेमे केले आहेत. 


आतापर्यंत नाना पाटेकरांवर अनेक महिलांनी गंभीर आरोप लावले. इंडस्ट्रीत अनेकांना हे माहित आहेत पण ते गप्प राहिले. त्यांनी अनेकदा महिलांचा अपमान केला असून अभिनेत्रींवर हात उचलला आहे. मात्र या गोष्टी कधी समोर आल्या नाहीत. यावर रविना टंडनचं म्हणणं आहे की, आता सोशल मीडियामुळे या गोष्टी सहज पुढे येतात.