मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांविरोधात आता राज्य महिला आयोगाकड़े तक्रार दाखल केली आहे. हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी विनयभंग केल्याचा तनुश्रीचा आरोप आहे. याप्रकरणी तिनं याआधी पोलिसांकडे तक्रार केली आहेच. त्यानंतर काल संध्याकाळी महिला आयोगातही दाद मागून न्याय मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान , आज तनुश्री पोलीस ठाण्यात जबाब नोंदवणार आहे. 


तनुश्रीच्या आरोपांचं खंडन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देतांना नानांनी तनुश्रीच्या आरोपांचं खंडन केलं आहे. ती जे काही सांगतेय ते खोटं असल्याचं नानांनी म्हटलं होतं. नानांच्या वकिलांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. तनुश्रीने २००८ मधील 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


#MeToo ची सुरुवात


तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये 2 गट पडले आहेत. काही जण नानांच्या बाजून आहेत तर काही तनुश्रीच्या बाजुने उभे आहेत. बॉलिवूडमध्ये #MeToo ची सुरुवात झाली आहे. अनेक जणांनी आता याबाबत आवाज उठवला आहे.