Tanushree Dutta : सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर आता तनुश्री दत्ता राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करणार आहे. अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. तनुश्री दत्ताने राखी सावंतवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. तिची प्रतिमा आणि करिअर खराब केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तनुश्री दत्ता मीडियाशी बोलताना म्हणाली, 'मी राखी सावंतविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी इथे आले आहे. 2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यान तिने तिला खूप त्रास दिला होता. आता पोलिसांनी अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.


तनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात एफआयआर दाखल केला


'आशिक बनाया आपने' मधून प्रसिद्ध झालेल्या तनुश्री दत्ताने सांगितलं की, तिने पाच वर्षांचे सगळी विधानं आणि पुरावे गोळा केले आहेत. या सगळ्या व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्ट तिने पोलिसांना सांगितली आहे. पोलीस कडक कारवाई करतील याची तिला खात्री आहे.


तनुश्री दत्ता राखी सावंतबद्दल काय म्हणाली?


राखीबद्दल बोलताना म्हणाली की 'निर्मात्यांनी राखी सावंतला गाण्यातून काढून टाकल्यानंतर तिला साइन केलं होतं. पण हे बघून राखी सावंतने वाद निर्माण केला. त्यानंतर निर्मात्याने तिला काढून राखी सावंतला परत घेतलं. निर्माता आणि राखी यांनी मिळून हा प्रहसन रचल्यामुळे हे सर्व नाटक जाणूनबुजून तिच्याविरोधात करण्यात आल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. पण तो चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही.'


तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर ताशेरे ओढत ती म्हणाली की, 'नानांची इंडस्ट्रीत प्रतिमा चांगली नाही. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातूनच तो समाजसेवा करतो. त्याचे हिरोईनसोबत अफेअर होते. तो आपल्या कुटुंबासोबत राहत नाही. नाना पाटेकर त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत तो राहत नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे.'


हेही वाचा : आवडत नसूनही ऐश्वर्याची 'ही' सवय सहन करते; नणंद श्वेता बच्चनचं 'ते' वक्तव्य चर्चेत


तनुश्री दत्तानेही नाना पाटेकर यांचा भाऊ मन्या सुर्वे हा नामांकित गँगस्टर असल्याचा आरोपही केला होता याची तिला नुकतीच माहिती मिळाली. तनुश्रीने सांगितलं की, 'जेव्हा तिने या सगळ्याविरोधात आवाज उठवला तेव्हा तिच्यावर दोनदा हल्ला झाला. गेल्या अडीच वर्षांत तिला अनेक धमक्या आल्या. या सगळ्याशिवाय या अभिनेत्रीने विवेक अग्निहोत्री आणि नाना पाटेकर यांच्या 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटावरही हल्ला चढवला. नानांचे चित्रपट असेच अपयशी ठरतात.'