मुंबई : तेलुगू सिनेमातून करियरची सुरुवात करणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूड चित्रपटांसह, साऊथ इंडियन चित्रपटांमध्येही तिने आपल्या भूमिकेची छाप सोडली आहे. तापसीने डेव्हिड धवन यांच्या 'चष्मे बहाद्दूर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता तापसी लवकरचं ‘शाबाश मिठु’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रमोशन दरम्यन तापसीने तिच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा एका मुलाखतीत सांगितला. तापसी मित्रांसोबत व्हेकेशनसाठी गोव्याला गेली असताना एक मुलगी तिच्या प्रेमात पडली होती. 


मुलाखती दरम्यान तापसीला “तुझ्यासोबत काम करणाऱ्या किंवा अन्य कोणत्याही मुलीच्या कधी प्रेमात पडली आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.  या प्रश्नाचं उत्तर देताना तापसीने तिच्यासोबत घडलेली गोव्यातील घटना सर्वांसोबत शेअर केली. 


तापसी म्हणाली, 'मी शुटिंसाठी नाही तर मित्रांसोबत सुट्ट्यांसाठी गोव्याला गेले होते. तेव्हा  माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की एक मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे. '


पुढे अभिनेत्री म्हणली, 'एक मुलगी माझ्या प्रेमात आहे, हे ऐकल्यानंतर मला चांगलं वाटलं. कारण एक मुलगी दुसऱ्या मुलीमध्ये नेहमीच चुका शोधत असते. म्हणून त्या मुलीला मी आवडते हे ऐकून भारी वाटलं होतं.' असं देखील तापसी म्हणाली. 


तापसीचा ‘शाबाश मिठु’ सिनेमा क्रिकेटर मिताली राजच्या जीवनपटावर आधारित असणार आहे.  सिनेमाचं दिग्दर्शन श्रीजित मुखर्जी यांनी केलं असून सिनेमात तापसी पन्नू आणि विजय राज यांच्या मुख्य भूमिका आहेत.  सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.