मुंबई : 'जोड के रखनी पडे कोई चिज.. मतलब तुटी हुई है' प्रत्येक वेळेस कोणत्याही गोष्टीमध्ये महिलांना माघार घ्यावी लागते. एक स्त्री तिच्या घरासाठी तिचं संपूर्ण आयुष्य पणाला लावते. पण त्या बदल्यात तिला मिळत काय तर 'थप्पड'. 'थप्पड' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नेहमी प्रमाणे यावेळेस देखील अभिनेत्री तापसी पन्नू एका दमदार कथेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'पिंक', 'बदला', 'सांड की आंख' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तर आता ती 'थप्पड' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा एका 'थप्पड' भोवती फिरताना दिसत आहे. समाजाचे विचार, पती-पत्नीच्या नात्यामधील चढ-उतार, महिलांवर क्षणोक्षणी होणारे अत्याचार इत्यादी गोष्टींची मांडणी चित्रपटात केली असेल असा अंदाज ट्रेलरच्या माध्यमातून बांधू शकतो. 


अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स आणि भूषण कुमार यांच्या टी सीरिज बॅनर खाली 'थप्पड' चित्रपट साकारण्यात येणार आहे. तापसी शिवाय चित्रपटात रत्ना पाठक शाह, मानव कौल, दीया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. २८ फेब्रुवारी रोजी 'थप्पड' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.