Tara Sutaria's Ex Aadar Jain Pre Wedding Function  : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाच्या एक्स-बॉयफ्रेंड आदर जैनचा रोका झाला. यात तारा सुतारियाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ती तयार झाल्याचे दिसत आहे. तारा सुतारियाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे आदर जैनचे त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदर जैन विषयी सांगायचं झालं तर हा रीमा आणि मनोज जैन यांचा मुलगा आणि राज कपूर यांचा नातू आहे. आदरनं गर्लफ्रेंड अलेखा आडवाणीसोबत रोका केला आहे. त्यात तारा सुतारियाचा तयार झाल्याचा फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला की ती त्या आदर जैनच्या रोका कार्यक्रमाला पोहोचली की काय? तर असं काही नाही आहे तारा सुतारिया ही तिच्या दुसऱ्या एका मैत्रिणीच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोण आहे अलेखा आडवाणी?


अलेखा आडवाणी ही एक यशस्वी बिझनेस वूमन देखील आहे. डीएनए रिपोर्ट्सनुसार, तिनं कॉर्नेल यूनिव्हर्सिटीच्या हॉटेल स्कूलमधून ग्रॅज्युएनश केलं. अलेखाच्या एका MNC मधून त्यांचं करिअरची सुरुवात केली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तारा सुतारीयानं तिच्या ज्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात संजना सांघी देखील उपस्थित होती. दरम्यान, आदर जैनची होणारी पत्नी आलेखा ही तारा सुतारियाची खास मैत्रीणी होत्या. तर तारा सुतारिया आणि आदर जैन यांचा ब्रेकअप होण्याचं कारण अलेखा आडवाणी असल्याचं म्हटलं जातं. 


एकीकडे आदर प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये ताराची इन्स्टाग्राम स्टोरीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर करत लिहिलं की ती एक पुस्तक वाचायवा सुरुवात करत आहे. ज्याचं टायटल आहे, 'कर्मा इज ए बी**च'. या पुस्तकाचा फोटो शेअर करत तिनं लिहिलं की 'आता शोम माकचं नवं पुस्तक माझ्या हाती लागलं आहे. कर्मा इज ए बी**च. मी वाचायला सुरु करणार आहे. आता प्रत्येकानं त्यीच एक कॉपी घ्यायला हवी.'


दरम्यान, तारा आणि आदर जैन यांच्याविषयी बोलायचं झालं तर 2023 मध्ये ते दोघं विभक्त झाले त्या आधी ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीत तारानं हे मान्य केलं होतं की त्यांचं नातं हे संपलं आहे. तारा आणि आदर हे एकमतानं विभक्त झाले आणि आता चांगले मित्र आहेत. ते दोघं नंतर एकत्र कधी दिसले नाही.