मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कलाकार मालिकेला रामराम करत असल्याने ही मालिका जास्त चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व कलाकारांमध्ये मात्र लाडकी दयाबेन नसल्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत. दयाबेन कधी परतणार असे प्रश्न वारंवार प्रेक्षकांकडून विचारले जात आहेत.



तर दयाबेनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिशा वाकाणी शोमध्ये परत येऊ शकते. तिने निर्मात्यांसमोर 3 अटी ठेवल्या असून या अटी मान्य होताच दिशा शोमध्ये परतणार असल्याचे बोलले जात आहे. त्या तीन अटी काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.



पहिली अट म्हणजे दिशा वाकाणीने फी वाढवण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत ती प्रत्येक एपिसोडसाठी 1.20 ते 1.25 लाख रुपये घेत होती, मात्र रिपोर्ट्सनुसार दिशाने प्रति एपिसोडसाठी 1.50 लाखांची मागणी केली आहे.


दुसरी अट म्हणजे दिशाने कामाचे तास कमी करण्यास सांगितले आहे. तिच्या म्हणण्यानुसार ती दिवसातून फक्त 3 तास शूट करणार आहे. तिसरी आणि शेवटची अट म्हणजे दिशाला सेटवर मुलीसाठी पाळणाघर बनवायचे आहे जेणेकरून तिची मुलगी तिच्यासोबत राहू शकेल.



आता या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे माहिती नाही मात्र ही गोष्ट खरी असेल तर निर्माते या तीन अटी मान्य करतील की नाही हे वेळ आल्यावरच कळेल.