Sunil Holkar Passes Away : चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रातून आपत्या मनोरंजनानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सुनिल होळकरचे ( Actor Sunil Holkar) निधन झाले. सुनिल यांच्या निधनानं मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सुनिल हे लिव्हर सोरायसिस (liver cirrhosis) या दुर्धर आजाराने ते त्रस्त होते. उपचार करूनही त्यांच्या स्वास्थात काही सुधारणा झाली नाही. सुनिल यांना लोक त्यांच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (tarak mehta ka oolta chashma) या मालिकेतील भूमिकेसाठी ओळखतात. या शिवाय सुनिल यांनी मोऱ्या चित्रपटात देखील काम केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गोष्ट एका पैठणीची', 'मोरया' या सारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावले होते. 'मॅडम सर', 'मि. योगी' अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. याशिवाय 'भुताटलेला' वेब सिरीज मधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत सुनिल होळकर त्यांनी बरीच वर्षे काम केलं. अभिनेता, निवेदक म्हणून लोक त्यांना ओळखायचे. जवळपास 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. (Sunil Holkar Death)



सुनिल होळकर यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली आहे. (Tarak Mehta Ka Oolta chashma Fame Sunil holkar Passes Away Marathi Actor Death)


लिव्हर सिरोसिस म्हणजे काय ?


कॅन्सरनंतर सगळ्यात गंभीर आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरॉसिसच्या शेवटच्या टप्प्यात त्यामधून बचावण्याचा एक मार्ग म्हणजे यकृताचं प्रत्यारोपण. जेव्हा यकृताचे टिश्युज नष्ट होतात तेव्हा ही समस्या जडायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हरचा आकार असामान्य होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीमध्ये पोर्टल हायपरटेंशन वाढण्यास सुरूवात होते. 


लिव्हर सिरोसिसचे तीन टप्पे 


लिव्हर सिरोसिसचा आजार हा तीन टप्प्यांमध्ये वाढतो. प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी लक्षण आढळतात. 


पहिला टप्पा


लिव्हर सिरॉसीसमध्ये पहिल्या टप्प्यात वजन कमी होणं, थकवा जाणवनं, पचन बिघडणं अशा समस्या जाणवतात. 


दुसरा टप्पा 
उलटी होणं, भूक मंदावणं, ताप येणं, चक्कर येणं  


अंतिम आणि तिसरा टप्पा 
अंतिम टप्प्यात अनेकदा रक्ताची उलटी होणं, लहानशा जखमेतूनही भळाभळा रक्तप्रवाह होणं, शुद्ध हरपणं अशी लक्षणं दिसतात. लिव्हर सिरोसिसच्या या टप्प्यात यकृत प्रत्यारोपणाशिवाय इतर पर्याय नाही.


कसा टाळाल लिव्हर सोरायसीस होण्याच धोका? 


लिव्हर सोरासिसचा धोका टाळायचा असेल तर खाण्या-पिण्यासोबतच तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा. दारू किंवा सिगारेटचं व्यसन असल्यास त्याचा मोह टाळा. आहारात गाजर, फळं, शिंगाडा, दूध, सोयाबिनचा समावेश करा. संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश केल्यास यकृताचं आरोग्य जपण्यास मदत होते. वरील लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता डॉक्टरचा सल्ला घ्या.