मुंबई : सब टीव्ही चॅनेलवरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील जेठालालच्या पत्नीची भूमिका करणारी दयाबेन अर्थात दिशा वाकाणी लवकरच गुड न्यूज देणार असल्याचे बोलले जातेय.


आजतकमध्ये छापलेल्या बातमीनुसार, दिशा वाकाणी रीअल लाईफमध्ये प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती शूटला आलेली नाही आणि याचे कारण तिची प्रेग्नंसी असल्याचे बोलले जातेय.


दिशा वाकाणीने २०१६मध्ये चार्टड अकाऊंटट मयुर पांड्या यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर दिशा ही मालिका सोडणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र लग्नानंतरही तिने मालिकेत काम करणे सुरुच ठेवले.